निवडून आलं की नेते मंडळींवर मोठी जबाबदारी असते. जनतेने मतांच्या रूपात दिलेला आशीर्वाद नेतेमंडळींना शेवटपर्यंत जपावा लागतो. कार्यकर्ते देखील हक्काने आपल्या नेत्याकडे मदतीचा हात मागतात. अगदी अवेळी देखील हक्काने आपल्या नेत्याला फोन करतात आपली व्यथा सांगतात.
मात्र हे सर्व मनसे नेते वसंत मोरे यांच्या अंगलट आल्याच पाहायला मिळत आहे. ‘नेता होणे सोपे नाही हे मान्य आहेच पण नेत्यालाही घरदार संसार असतो हे ही जनतेने मान्य केलेच पाहिजे,’ असं वसंत मोरे यांनी म्हंटले आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून जनतेला याबद्दल विनंती केली आहे.
https://www.facebook.com/100044231363898/posts/pfbid0287zKU9RBqMeS3xYZSCyiKL5Gxqr63n4qh9dPJh1XBw9QScVpUygCUqgGyPYYy6PEl/?d=n
वाचा नेमकं वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये काय लिहिले आहे? वसंत मोरे म्हणतात,’आजकाल काय झालंय माझ्यावर अतिप्रेम करणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. पण त्यांना साधा सेन्स नसतो की कोणत्या कामासाठी कधी फोन करावा मागील आठवड्यात रात्री १२:०० वा. ऐकाने फोन केला आणि तक्रार काय तर हॉटेलचे बिल जादा घेतोय, आता काय करावे ?.’
तसेच पुढे पोस्टमध्ये मोरे म्हणतात, ‘नेता होणे सोपे नाही हे मान्य आहेच पण नेत्यालाही घरदार संसार असतो हे ही जनतेने मान्य केलेच पाहिजे. नाहीतर खरंच ज्यांना मदत हवी आहे त्यांची अडचण होणार. तेव्हा प्लीज हात जोडून विनंती आहे निदान आमच्यासाठी नाही तर गरजवंतांसाठी तरी चुकीच्या कामासाठी अवेळी नका फोन करत जाऊ, अशी विनंती त्यांनी केली आहे.
दरम्यान, ‘मी गेली १५ वर्ष मनसेचा नगरसेवक म्हणून काम करतोय. मी रोज दिवसभरात कमीत कमी १५० पेक्षा जास्त फोन घेतो फोन करतो पण कधी कोणावर वैतागत नाही, तसेच रोज रात्री १२:०० ते १२:३० वाजेपर्यंत फोन ही चालू ठेवतो. कारण कधी कधी कोणाला मेडिकल / हॉस्पिटलची गरज पडते, तर कोणाला अपघातात मदत हवी असते.’
मात्र अलीकडे माझ्यावर अतिप्रेम करणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. काल एकाने अहमदनगर हायवे वरून फोन केला काय तर म्हणे माझी गाडी पंचर झाली आहे इकडे कोण आहे का आपले, आता काय करावे ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच किरकोळ कामांसाठी फोन करू नका असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘रानबाजार’मधील भूमिकेविषयी प्राजक्ता माळीची पोस्ट तुफान व्हायरल; “आणि जो सीन माझ्या कारर्किदीतला…”
करण जोहरची जंगी पार्टी भोवली? बाॅलीवूडच्या तब्बल ५५ कलाकारांना करोनाची लागण
अशोकमामांचा दिलदारपणा पुन्हा आला समोर; गरजू कलाकारांना मदत करण्यासाठी केली ‘ही’ मोठी घोषणा
‘या’ शहरातून रचला सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा प्लॅन; पोलिसांच्या हाती आले मोठे पुरावे, दोन जण ताब्यात