Share

‘आरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे’; वसंत मोरेंनी केले नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचे अभिनंदन

vasant more

पुणे: मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे(Pune) शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे वसंत मोरे यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. मनसे(MNS) पक्षाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.(vasant more congratulate sainath babar)

मात्र वसंत मोरेंनी पक्षाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी हटके फेसबूक पोस्ट करत नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचे अभिनंदन केले आहे. “आरे मी तर कधी पासूनच तुझा मावळा आहे ” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड खुप खुप अभिनंदन साई” असे म्हणत वसंत मोरेंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

https://www.facebook.com/mnsadhikrutpage/posts/5012378505520643

या फेसबूक पोस्ट मधील फोटोमध्ये वसंत मोरे मावळ्यांच्या वेशात आहेत. तर साईनाथ बाबर छत्रपतींच्या वेशात आहेत. त्याला उद्देशुनच वसंत मोरेंनी ही पोस्ट केली आहे. या पोस्टवरून असे दिसत आहे की वसंत मोरे दुसऱ्या कोणत्याही पक्षात न जाता मनसेतच कायम राहतील.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला बाबू वागस्कर, अनिल शिदोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर हजर होते. पण या बैठकीला वसंत मोरे यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वसंत मोरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा रंगू लागली होती.

यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती मिळत होती. तसेच वसंत मोरेंनी मनसे पक्षाचा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप देखील सोडला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात वसंत मोरेंनी विधान केले होते.

“जर मशिदीवर भोंगे वाजत असेल तर त्याच्या समोर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा लावा”, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलं होतं. यावर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पक्षाच्या शाखेवर भोंगे लावले होते. पण राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे वसंत मोरे नाराज होते.

वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये राज ठाकरे यांच्या भूमिकेला नकार दिला होता. यावेळी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, “मी एक क्लिअर करतोय की माझी राज ठाकरेंवर किंवा पक्षावर कुठलीही नाराजी नाहीये. पण राजसाहेबांचं भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळलंच नाही,” असं सांगितलं. याचबरोबर मी माझ्या प्रभागामध्ये हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे मशीदींसमोर लावणार नाही”, असे त्यांनी सांगितले होते.

त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वसंत मोरे यांच्यावर नाराज होते. या नाराजीतूनच राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. आता वसंत मोरे यावर कोणतं पाऊल उचलणार? याची उत्सुकता जनतेला लागली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वसंत मोरेंना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. ते म्हणाले वसंत मोरेंचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात स्वागत आहे. तसेच मनसेतून राष्ट्रवादीत गेलेल्या रूपाली ठोंबरे पाटील यांनीही मोरेंना राष्ट्रावादीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. पण मोरे हे निमंत्रण धूडकावून लावतील असेच त्यांच्या भूमिकेवरून दिसून येत आहे.

शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्यानंतर वसंत मोरे यांनी मत व्यक्त केलं आहे. “साईनाथ बाबर माझाच कार्यकर्ता आहे. त्याच्या नियुक्तीचे मीच स्वागत करतो. मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही. माझं शहराध्यक्ष पद गेलं आहे. पण मनसे सैनिक पद गेलेलं नाही. माझ्या संपर्कात खूप लोकं आहेत. पण मीच कोणाशी संपर्क केलेला नाही. मला सर्व मनसे नेत्यांचे फोन आले आहेत. पण मला अजुन राज साहेबांचा फोन आलेला नाही”, असे वसंत मोरे म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now