राज्यात सध्या भोंग्यांच्या मुद्यावरुन वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी औरंगाबादमध्ये, ठाण्यात आणि गुढीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत मशिदींवरील भोंग्यांवर आक्रमक भूमिका घेतली होती. लवकरात लवकर हे भोंगे खाली उतरवा असे राज ठाकरेंनी म्हटले होते.
मात्र मनसे नेते वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ते मनसे सोडणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता? पण आपण मनसेतच राहणात असल्याचे वसंत मोरेंनी स्पष्ट केले होते. अशात हनुमान महाआरतीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते.
तर आता मोरे हे एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत. नुकतीच मोरे यांनी ईद साजरी केली आहे. ईद साजरी करतानाचे फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे. मनसेचे वाहतूक सेनेने शहर सरचिटणीस आवेज भाई शेख यांच्या घरी ही मेजवानी झाली. याबाबत मोरेंनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
पोस्टमध्ये मोरे म्हणतात, ‘महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पुणे शहर सरचिटणीस आवेजभाई शेख यांचे घरी जेवण केले. सोबत सुनील अंधारे (पाटील) पुणे शहर वाहतूक उपाध्यक्ष, शाखा अध्यक्ष अमितआण्णा जगताप, शाखा अध्यक्ष मंगेश रासकर होते. परिसरातील बरेच नागरिकही उपस्थित होते.
https://www.facebook.com/vasantmore88/posts/pfbid078K62N4vYLKH8opshzQ275JCTiqKyyP42Voc3d5UbsswT9xuzhh3pExHxqc5iL87l
दरम्यान, कात्रज भागातील त्यांच्या ऑफिससमोरच्या भागातील हनुमान मंदिरात वसंत मोरेंनी महाआरतीचे आयोजन केले होते. मात्र या महाआरतीला राज ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनीही गैरहजेरी लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. राज ठाकरे हे तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहे.
त्यामुळे ते वसंत मोरे यांच्या महाआरतीला उपस्थित राहणार की नाही? अशी चर्चा होती. मात्र राज ठाकरेंनी महाआरतीच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली. तसेच शहरातील मनसेचे इतर पदाधिकारीही यावेळी हजर नव्हते. अशातच आता आज या महाआरतीनंतर मोरे यांनी राज ठाकरे यांची पुण्याच्या निवासस्थानी भेट घेतली.
याभेटीनंतर मोरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मोरे यांनी सांगितलं की, “काल झालेल्या महाआरतीचं साहेबांनी कौतुक केलं. तसेच साहेबांना काल येता आलं नाही. पण ‘वसंत तू मिसळ महोत्सव घे, मी येतो,’ असा सल्ला त्यांनी दिला. तसेच राज ठाकरेंना आणखी एका कार्यक्रमाबद्दल सांगितलं असल्याच मोरे यांनी सांगितले.