Share

‘कुणाचीही युती व्होवो, ३ पक्ष काय ३० पक्ष एकत्र आले तरीही…,’ युवा सेनेने थोपटले दंड, दिले थेट आव्हान

Aditya Thackeray

आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. सत्तांतरणानंतर राज्यातील राजकारणात मोठे बदल घडून आले. सगळ्यात मोठा बदल म्हणजे शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. त्यामुळे अनेक बाबतीत वादही होत आहे.

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठे बदल घडून येण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये गाठी – भेटींच प्रमाण वाढलं आहे. सध्या जोरदार बैठकांचे सत्र सुरू आहे. अशातच काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली.

आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-मनसे युतीचे संकेत दिसू लागले आहेत. आता यावरून युवा सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ‘३ पक्ष काय ३० पक्ष एकत्र आले तरीही मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीर आहेत,’ असं युवासेने म्हंटलं आहे.

वाचा नेमकं युवासेने काय म्हंटलंय?
युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी मनसे-भाजपा-शिंदे गट संभाव्य युतीवर सलोख भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना सरदेसाई यांनी म्हंटलं आहे की,’मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेने गेल्या ३० वर्षात, उद्धव ठाकरेंनी अनेक आव्हानं पेलली आहेत.’

‘यंदाही युतीत नसताना आम्ही आव्हान पेलू आव्हान आम्ही पेलू. समोर कुणीही येवो, कुणाचीही युती व्होवो. ३ पक्ष काय ३० पक्ष एकत्र आले तरीही मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीर आहेत, असं म्हंटलं सरदेसाई यांनी थेट शिंदे गट आणि भाजपला लक्ष केलं आहे.

दरम्यान, पुढे बोलताना सरदेसाई यांनी मुंबई महानगर पालिका जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ‘शिवसेना आगामी मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक केवळ लढणार नाही तर जिंकणार असल्याचा विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

‘या’ कारणामुळे २ महिन्यातच मुख्यमंत्री शिंदेंना वैतागले अधिकारी; वाचा नेमकं असं काय घडलं?
…तर आम्ही राज ठाकरेंनाच बाहेर काढू; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगीतलं
‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, शिंदे गटाने आखली वेगळीच रणनीती, उद्धव ठाकरेंसमोरील अडचणींमद्धे वाढ
पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप आमदाराने घेतले पैसे; स्वत: कबुली देतं केला मोठा खुलासा, ऑडिओ क्लिप व्हायरल
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now