Share

बेरोजगारीमुळे देशातील परीस्थीती बिकट, त्यापासून दूर जाणे म्हणजे कापसाने आग विझवणे; भाजप खासदाराचा मोदींना घरचा आहेर

narendra modi

देशात अनेक ठिकाणी आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये विशेषत: विद्यार्थी चांगलेच संतापलेले पाहायला मिळत आहे. आरआरबी एनटीपीसी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बिहारमधील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. मंगळवारी या विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी रेल्वे इंजिनला आग लावली आहे. या विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (varun gandhi target on central government)

१४ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांनी केला आहे. निकालात झालेल्या गैरप्रकारामुळे हे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी बिहारमधील बक्सर, मुझफ्फरपूर, नवादा, सीतामढी, आराम आणि नालंदा या ठिकाणी रेल्वे ट्रॅक जाम केला होता.

भाजप खासदार वरुण गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणावर तसेच बेरोजगारीच्या प्रश्नावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. वरुण गांधी म्हणाले, “आज बेरोजगारी ही देशातील सर्वात मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यापासून दूर जाणे म्हणजे कापसाने आग झाकण्यासारखे आहे.’ असे म्हंटले आहे.

दरम्यान, अर्थव्यवस्था आणि शेतीसारख्या मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करताना वरुण गांधी यांनी गेल्या काही दिवसांत पाटणा येथे रेल्वे भरतीत झालेल्या अनियमिततेबाबतच्या आंदोलनादरम्यान एका तरुणाशी झालेल्या संभाषणाचा बीबीसी व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये विद्यार्थी सरकारला रस्त्यावर आणण्याविषयी बोलत आहे.

https://twitter.com/varungandhi80/status/1486978288400875526?s=20&t=DecCoJJvdZupmjEPiKDKtQ

 

तसेच रेल्वे आणि एनटीपीसीमधील गोंधळावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याबद्दल वरुण गांधी यांनी सरकारचा निषेध केला आहे. व्हिडिओमध्ये विद्यार्थी म्हणत आहे की, पकोडे विकणे ही चुकीची गोष्ट नाही, परंतु पदवीधराला पकोडे विकायला आवडेल का? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.

याचबरोबर वरुण गांधी यापूर्वी लोकांशी संबंधित अनेक मुद्द्यांवरून आपल्याच सरकारला घेरत आहेत. सरकारच्या अनेक धोरणांवरही त्यांनी जाहीरपणे टीका केली आहे. वरुण गांधी यांच्या भूमिकेमुळे त्यांचेच सरकार आणि भाजप अस्वस्थ होते. यूपी निवडणुकीत वरुण गांधी यांचा समावेश स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपकडून करण्यात आलेला नाही. रेल्वे बोर्डाच्या परीक्षा आणि बेरोजगारीवरही विरोधक टीका करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
..त्यावेळी रवीना टंडनने फराह खानला खुल्लेआम दिली होती धमकी, कारण वाचून अवाक व्हाल
ओमिक्रॉननंतर आता निओकोव्हची भिती, प्रत्येक तीनपैकी एकाचा होऊ शकतो मृत्यु; वुहानच्या शास्त्रज्ञांचा दावा
सिद्धूवर बहिणीचा गंभीर आरोप; बहीण रडत म्हणाली- वडिलांच्या मृत्यूनंतर आईला बेवारस सोडले
जिओचा जबरदस्त प्लॅन! फक्त १४९ रुपयांमध्ये दररोज १ जीबी डेटा आणि बरंच काही, जाणून घ्या

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now