वरूण धवन-नताशा दलालच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण; अभिनेत्याने शेअर केले खास फोटो

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन आणि नताशा दलाल मागील वर्षी २४ जानेवारी रोजी विवाहबंधात अडकले (Varun Dhawan And Natasha Dalal’s Wedding) होते. तर काल त्या दोघांनी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने वरूण धवनने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे आणि हळदी समारंभाचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो यापूर्वी कधीच समोर आले नव्हते. अशात वरूणने हे फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

वरूण धवनने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दिसत आहे की, हळदी समारंभावेळी वरूण त्याच्या मित्रांसोबत पाण्यात मस्ती करत आहे. तसेच एका फोटोत वरूण त्याच्या मित्रासोबत पूलमध्ये दिसून येत आहे. हळदी समारंभावेळी वरूण आणि त्याच्या मित्रांनी खूपच धमाल केल्याचे या फोटोत पाहायला मिळत आहे.

याअगोदर वरूणने त्याच्या लग्नसमारंभादरम्यानचेही काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पहिल्या फोटोत वरूण-नताशा एकमेकांचे हात पकडलेले दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत ते एकमेकांना वरमाला घालत आहेत. तर तिसऱ्या फोटोत ते एकमेकांना नमस्कार करत असल्याचे दिसून येत आहे.

याशिवाय वरूणने त्याच्या रिसेप्शन दरम्यानचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये वरूण-नताशा रोमँटिक अंदाजात दिसून आले. वरूण-नताशाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच या फोटोंवर त्यांच्या चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट करत त्या दोघांना शुभेच्छा दिल्या.

वरूण धवन आणि नताशा दलालने दीर्घकाळ एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर त्या दोघांनी २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. कोरोनामुळे त्यांच्या लग्नात कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित राहिले होते. मात्र, त्यांच्या लग्नाची सिनेसृष्टीत जोरदार चर्चा झाली होती.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास वरूण लवकरच ‘भेडिया’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कृती सेनन मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय तो ‘जुग जुग जियो’ या चित्रपटातही दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अनिल कपूर, कियारा अडवाणी आणि नीतू कपूर दिसणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
lata mangeshkar health update: लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत खोट्या बातम्या व्हायरल, तब्येतीत झालीये सुधारण
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; ‘या’ कारणामुळे ‘अला वैकुंठपुरमलो’ सिनेमागृहात होणार नाही प्रदर्शित
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवालच्या घरी लवकरच येणार नवा पाहुणा; फोटो शेअर करत दिली गुड न्यूज