बॉलिवूड अभिनेता वरूण धवनच्या ड्राईव्हरचे बुधवारी निधन झाले. मनोज साहू असे त्यांचे नाव असून ह्रदविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान वरूण धवनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मनोज यांच्या निधनावर आपला दुःख व्यक्त केला आहे.
मनोज साहू दीर्घकाळापासून वरूण धवन आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत काम करत होते. ते वरूणचे केवळ ड्रायव्हरच नाही तर चांगले मित्रसुद्धा होते. वरूण त्यांना दादा म्हणून बोलवत असत. मनोज यांच्या जाण्याने वरूण आणि त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत वरूणने एका पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
वरूणने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक जुना व्हिडिओ शेअर करत मनोज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हा व्हिडिओ हॉन्ग कॉन्गमध्ये झालेल्या Madame Tussauds कार्यक्रमादरम्यानचा आहे. या व्हिडिओत वरूण सर्वांना मनोज यांची ओळख करून देताना दिसत आहे. तसेच मनोज यांनी नेहमी त्याची साथ दिल्याचेही वरूण या व्हिडिओत सांगत आहे.
व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, ‘मनोज गेल्या २६ वर्षांपासून माझ्या आयुष्यात आहेत. ते माझे सर्वस्व होते. माझे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.पण मला फक्त इतकेच हवे आहे की लोकांनी त्यांचा समंजसपणा, हसमुख व्यक्तीमत्व आणि जीवन जगण्याची त्यांची आवड लक्षात ठेवावी. मनोज दादा.. माझ्या आयुष्यात मी तुझा नेहमीच ऋणी राहीन’.
वरूणच्या या पोस्टवर अनेक चाहते आणि सेलिब्रिटीसुद्धा कमेंट करत मनोज यांना श्रद्धांजली वाहत आहेत. याशिवाय वरूणने त्याच्या इन्स्टा स्टोरीलाही मनोज साहू यांचे काही व्हिडिओ शेअर करत ते कायम स्मरणात राहतील, असे म्हटले आहे.
रिपोर्टनुसार मनोज साहू मंगळवारी वरूणला महेबूब स्टुडिओमध्ये शूटिंगसाठी सोडायला गेले होते. त्यानंतर त्यांना अचानकपणे छातीत दुखत असल्याने लगेचच त्यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या :
‘आई कुठे काय करते?’ फेम मधुराणी गोखलेंनी सांगितले वैयक्तिक आयुष्यातील सत्य, अरुंधतीप्रमाणे माझ्याही आयुष्यात…
सुरक्षारक्षकाची नजर चुकवून ‘मन्नत’मध्ये घुसला होता शाहरूखचा चाहता; पकडल्यावर म्हणाला,…
काळी साडी आणि हलव्याच्या दागिन्यात खुलून आलं मितालीचं सौंदर्य; शेअर केले लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीचे खास फोटो