Share

‘खैरेसाहेब…! दोन दिवसात माफी मागा, नाहीतर दिसाल तिथे काळं फासू,’ वंचित बहुजन आघाडी आक्रमक

chandrkant kahire

राजकीय वातावरण तापलेले असतानाच काही दिवसांपूर्वी ‘वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता.

खैरे यांच्या या वक्तव्याने आता राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. खैरे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘दोन दिवसात माफी मागा, नाहीतर दिसाल तिथे काळं फासू,’ असा गर्भित इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

याबाबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद यांनी तर चंद्रकांत खैरेंना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता खैरे यांच्या अडचणीत वाढ होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज औरंगाबाद जिल्ह्यातील वंचितच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली.

या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी खैरे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. दोन दिवसात माफी मागितली नाही, तर जिथे सापडतील तिथे काळे फासणार असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. एवढच नाही तर माफी नाही मागितली तर २ जून रोजी खैरे यांच्या मछली खडक येथील घरावर मोर्चा काढू, असही त्यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने भाजपकडून लोकसभा निवडणुकीत १ हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. त्यांच्याकडे तसे पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांना द्यावेत, अशी मागणी वंचितने आघाडीने केली आहे.

वाचा काय म्हणाले होते चंद्रकांत खैरे..? ‘वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. खैरे यांच्या या वक्तव्याने सध्या राजकरण तापलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
नताशाच्या प्रेमामुळे सतत वादात राहणारा पांड्या बनला जबाबदार, नाईट क्लबपासून सुरू झाली दोघांची लव्हस्टोरी
PHOTO: नताशापेक्षाही सुंदर आहे हार्दिक पांड्याची वहिनी, हटके आहे भाऊ क्रुणाल पांड्याची लव्हस्टोरी
नताशासोबतचा फोटो शेअर करत पांड्याने दिले मनाला भिडणारे कॅप्शन; म्हणाला, हे आपल्या मेहनतीचे..
IPL विनर गुजरातचे ‘ते’ पाच खेळाडू जे रॉयल लाईफस्टाईलमध्ये आहेत सगळ्यांचे किंग, वाचा यादी

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now