Share

लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याने गदारोळ; अखेर वैष्णवी पाटीलने मागितली महाराष्ट्राची माफी

vaishnavi patil

नृत्यांगना वैष्णवी पाटील ही सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. लाल महालातील ‘चंद्रा’ वैष्णवीला चांगलीच भोवली आहे. पुण्यातील लाल महालात लावणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. यावर आता राजकीय, सामाजिक आणि सिनेसृष्टीतून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया येत असून संभाजी ब्रिगेडनं संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात चार जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे वैष्णवी पाटील हिने या प्रकरणी जाहीर महाराष्ट्राची माफी मागितली आहे.

https://www.instagram.com/tv/CdyTF-eD5T6/?utm_source=ig_web_copy_link

या प्रकरणी बोलताना वैष्णवीने म्हंटलं आहे की, ‘लाल महालात लावणीचा व्हिडीओ करत असताना माझ्या मनीध्यानीही काहीच आलं नव्हतं की यातून काही वाद निर्माण होईल. भावना दुखावल्या जातील हे मनातही आलं नव्हतं. मात्र ही चूक माझ्याकडून झाली हे मला कळलं. त्याक्षणी मी तो व्हीडिओ डिलिट केला. मी सर्वांना आज सांगते आहे की तो व्हीडिओ डिलिट करा,’ असं आवाहन तिने केले आहे.

वैष्णवीने इंस्टाग्राम अकाऊंटवर लाईव्ह येत माफी मागितली आहे. तसेच पुढे तिने म्हंटलं आहे की, ‘जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असा माझा काहीही हेतू नव्हता. तरीही माझ्याकडून ही चूक झाली त्याबद्दल मी माफी मागते,’ असं म्हणत तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान,  याच प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यावरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत आव्हाड म्हणतात, ‘पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल हि वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे …ह्यापुढे होता कामा नाही.. कोणी केले असेल तर वापरू नका.’

तर दुसरीकडे पुणे शहरातील ऐतिहासिक लाल महाल मध्ये लावणीचा व्हिडीओ शुट केल्यामुळे याचा विरोध म्हणून अनेक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. लाल महालाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आली आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
नवाब मलिकांचे दाऊद गॅंगशी संबंध, त्यांनी दाऊद टोळीची मदत घेतल्याचे पुरावे; कोर्टाने स्पष्टच सांगितले
भारतावर इजिप्त प्रचंड खुश! आता आणखी १२ देशही करत आहेत तशाच मदतीची मागणी
‘रानबाजार’मधल्या बोल्ड दृश्यांमुळे तेजस्विनी ट्रोल; तेजस्विनीच्या आईने टीका करणाऱ्यांनाच झापले
संभाजीराजेंना कधीही भाजपचा प्रचार करायला लावला नाही; फडणवीसांनी शिवसेनेला सुनावले

इतर ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now