Share

मृत्युनंतरही वैशाली ठक्करने दुसऱ्याच्या जीवनात आणला प्रकाश, कुटुंबाने शेवटची इच्छा केली पुर्ण

‘ये रिश्ता क्या कहलाता है आणि ‘ससुराल सिमर का फेम अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. वयाच्या 30 व्या वर्षी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वृत्तानुसार, वैशाली ठक्करने 15 ऑक्टोबर रोजी इंदूरमधील तिच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती.

वैशालीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. ज्यामध्ये तिने उद्योगपती राहुल नवलानी आणि त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. 16 ऑक्टोबर रोजी वैशालीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, अभिनेत्रीवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी तिच्या कुटुंबीयांनी वैशालीची शेवटची इच्छा पुर्ण केली.

वैशाली टक्करच्या चुलत बहिणीने इंडिया टुडेला सांगितले की, वैशालीला तिचे डोळे खूप आवडत होते आणि ती मरण्यापूर्वी तिचे डोळे दान करू इच्छिते असे अनेकदा म्हणायची. याबाबत तिने आईशी बोलणे केले होते. तिची शेवटची इच्छा पुर्ण करण्यात आली आहे.

वैशालीच्या चुलत भावाने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या शेवटच्या इच्छेनुसार कुटुंबाने रविवारी, 16 ऑक्टोबर रोजी अंतिम संस्कारापूर्वी तिचे डोळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दान केले आहेत जेणेकरुन त्या सुंदर डोळ्यांनी हे जग इतर कोणालाही पाहता येईल.

वैशाली टक्कर ‘ससुराल सिमर का’ मध्ये अंजली भारद्वाज, ‘सुपर सिस्टर्स’मध्ये शिवानी शर्मा, ‘विश या अमृत: सितारा’मध्ये अनन्या मिश्रा आणि ‘मनमोहिनी 2’ मध्ये नेत्रा सिंग राठौर यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होती. वैशाली टक्करने स्टार प्लसच्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधून टीव्हीवर पदार्पण केले.

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत तिने 2015 ते 2016 पर्यंत संजनाची भूमिका साकारली होती. 2016 मध्ये तिने ‘ये है आशिकी’मध्ये वृंदाची भूमिका केली होती. तिचा अखेरचा टीव्ही शो ‘रक्षा बंधन’ मध्ये कनक सिंह ठाकूरच्या भूमिकेत ती दिसली होती.

महत्वाच्या बातम्या
Eknath shinde: शिंदेंसोबत गेलेले आमदार अस्वस्थ, ते परत येण्यासाठी प्रयत्न करतायत, बड्या शिवसेना नेत्याचा दावा
Bachu Kadu : ‘आधी खिसा कापणार आणि नंतर…’; बच्चू कडू यांची मित्रपक्षावरच जळजळीत टीका
Shinde group : महापालिका निवडणुकीआधीच शिंदेंचा मित्र पक्षाला धक्का; भाजपचा मुंबईतील ‘हा’ मंत्री फोडला

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now