बबली… खोडकर आणि आनंदी अभिनेत्री वैशाली ठक्कर तिच्या खास शैलीने चाहत्यांची मने जिंकत असे. सदैव हसतमुख असणाऱ्या वैशालीने आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आणि सर्वजण अस्वस्थ झाले. वैशालीच्या चाहत्यांना विश्वास बसत नाही की, ती आता आपल्यासोबत नाही, कारण वैशाली ही एक अशी व्यक्ती होती जिने खूप संघर्ष केला आणि पुढे गेली. अशा परिस्थितीत तिला जीव गमवावा लागणे अत्यंत धक्कादायक आहे. Vaishali Thakkar, Suicide, Sushant Singh Rajput
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री वैशाली ठक्कर, जिने इतक्यातच आत्महत्या करून स्वतःचा जीव घेतला आहे. तिच्यात आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूतमध्ये अनेकप्रकारचे साम्य पाहायला मिळत आहे. दोघांमध्ये खूप घट्ट नाते देखील होते. याविषयी अधिक जाणून घेऊया.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण ‘ससुराल सिमर का’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यांसारख्या शीर्ष मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री वैशाली ठक्कर ही अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण आहे. वैशाली ठक्कर हिने इंदूर येथे राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे तिचा मित्र सुशांत सिंग राजपूत यानेही अशाच प्रकारे आपला जीव घेतला होता.
प्राथमिक तपासानुसार वैशालीने प्रेमप्रकरणातून हे कृत्य केले आहे आणि वैशालीने 2021 मध्ये साखरपुडाही केला होता. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, कोविडच्या काळात वैशालीचे लग्न होणार होते, पण त्यावेळी तिने ते पुढे ढकलले होते आणि त्यानंतर याबद्दल काहीही अपडेट नव्हते.
एका जुन्या मुलाखतीत वैशालीने सुशांतच्या मृत्यूला खून असल्याचे म्हटले होते. जेव्हा तिला रिया दोषी असल्याचे विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, यामागे कोणीही एक व्यक्ती नाही आणि रियाला नक्कीच वाचवले जात आहे. सुशांत आणि वैशाली, हे दोघेही एकमेकांचे फ्रेंड होते. दोघेही छोट्या शहरातून आले होते, दोघांनीही टीव्हीमधून करिअर सुरू केले होते आणि दुर्दैवाने दोघांचा शेवट सारखाच होता.
महत्वाच्या बातम्या-
Sharad Pawar : “शरद पवारांनी उध्दव ठाकरेची लाज राखण्यासाठी बिनविरोध निवडणूक व्हावी असा आग्रह धरला आहे”
अपूर्वा-शशांकच्या लग्नात आदर्श शिंदे आणि वैशाली सामंतने लावले ठुमके; पहा भन्नाट डान्स व्हिडीओ
Vaishali Thakkar : वैशाली ठक्करने आत्महत्या का केली? सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा