Share

Vaishali Suryavashi : खबरदार! यापुढे माझ्या वडीलांचा फोटो लावला तर…; शिंदेगटातील आमदारावर बहीण भडकली

eknath shinde vaishali suryavanshi

Vaishali Suryavashi criticize kishor patil  | एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन गट पडले आहे. एक म्हणजे उद्धव ठाकरेंचा गट आणि दुसरा गट म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिंदे यांच्या गटात अनेक मोठे नेते जाताना दिसून येत आहे. तर काहींनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणे पसंत केले आहे.

जळगावात एका आमदार भावाने एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. पण त्याच्या बहिणीने मात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. त्यामुळे आता बहिण भाऊच एकमेकांचे कट्टरविरोधक झाले आहे. तसेच बहिण आपल्याच भावावर आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळत आहे.

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पण त्यांची बहिण वैशाली सुर्यवंशी या अजूनही उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत आहे. त्यामुळे आता वैशाली सुर्यवंशी या आपल्या भावावरच आक्रमक झाल्या आहे. ज्यांनी तुम्हाला राजकारणाचा वारसा दिला आहे, त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य करणे दुर्देवी आहे, असे वैशाली सुर्यवंशी यांनी किशोर पाटील यांच्यावर टीका केली आहे.

पाचारो या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून सभेचं आयोजन करण्यात आले होते. त्यात वैशाली सुर्यवंशी यांनी किशोर पाटील यांच्यावर टीका केली आहे. अलीकडेच किशोरी पाटील यांनी वक्तव्य केले होते, ते म्हणाले होते की, आर ओ पाटील तात्यांनी त्यांचं दुकान बंद केले आहे. त्यावरही वैशाली सुर्यवंशी यांनी टीका केली आहे.

ते म्हणाल्या की, तात्यांनी कधी कोणतं दुकान उघडलंच नव्हतं. मात्र ज्यांनी तुम्हाला राजकीय वारसा दिला. आमदारकी बहाल केली. त्या तात्यांवर सुद्धा टीका करता. तर मग त्यांचा फोटो कशाला वापरताय? असे वैशाली सूर्यवंशी यांनी किशोर पाटलांना म्हटले आहे.

यापुढे आता स्वत:च्या बळावर राजकारण करा. खबरदार जर त्यांचा फोटो वापरला तर. तुम्ही तात्यांच्या विचारांवर चालणार नाही. तत्वांवर वागणार नाही. मग त्यांचा फोटो वापरण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तात्यांनी सर्व उभे करुन दिले आहे. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण करु नका, असेही वैशाली सुर्यवंशी यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Indian team : झिम्बाब्वेने भारताला हरवले, तर झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करणार; प्रसिद्ध अभिनेत्रीचे थेट चॅलेंज
Mahesh Tilekar : शिवाजी महाराजांचा चूकीचा इतिहास दाखवण्याचं पाप करण्यापेक्षा; प्रसिद्ध दिग्दर्शकाने निर्मात्यांना झापले
VIDEO: ना हिंदू, ना मुसलमान, हा आमचा शाहरूख खान, चाहत्याचे बोलणे ऐकून शाहरूखने मारली मिठी

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now