Share

Vaishali suryavanshi: बंडखोर आमदाराला बहिणीनेच दिले आव्हान, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त केलं असं काही..

Vaishali suryavanshi | महाराष्ट्रात ठाकरे आणि शिंदे वाद अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. या फुटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थीतीत मोठा बदल झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० शिवसैनिक व १० अपक्ष आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेनेचे दोन गट निर्माण होऊन शिंदे सरकार सत्तेवर आले आहे. तसेच शिंदे गटाचे पारडे सध्या जड आहे.

ठाकरे – शिंदे वादानंतर आता आणखी एका कुटुंबामध्ये दोन गट पडल्याची बातमी ऐकायला मिळत आहे. पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व निर्मल उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक कै. आर ओ पाटील यांच्या कन्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आपण ठाकरे सरकारसोबत असल्याचे सांगितले आहे.

वैशाली सुर्यवंशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मोठमोठे फलक लावून आपण ठाकरे सरकारसोबत असल्याचे स्पष्ट केले. तसेच पक्षाने जबाबदारी दिल्यास यशस्वीपणे पार पडण्याचे आश्वासनही दिले आहे.

आर ओ तात्या पाटील यांचे राजकीय वारसदार समजले जाणारे आमदार किशोर पाटील यांना ही बातमी मोठे आव्हान ठरणारी आहे. आमदार किशोर पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्यापासूनच सहभागी होते. वैशाली सुर्यवंशी यांच्या या भूमिकेमुळे माजी आमदार कै. आर ओ पाटील आणि आमदार किशोर पाटील यांच्या कुटुंबामध्ये दोन गट पडल्याचे बघायला मिळत आहे.

वैशाली सुर्यवंशी यांच्याकडून राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत दिले जात आहेत. तसेच ही कौटुंबिक फुट पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघ क्षेत्राला नवी दिशा देणारी व राजकीय भूकंप करणारी ठरणार असल्याचे सूर राजकीय गटात व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या
Elon musk: एका स्त्रीसाठी का भिडले जगातील सर्वात श्रीमंत दोन व्यक्ती? जगभरात चर्चेत आलीये ‘ही’ प्रेमकहाणी
Disha and tiger: दिशा पाटनी आणि टायगरचे ६ वर्षांचे नाते संपुष्टात, जवळच्या मित्रानेच दिली धक्कादायक माहिती
उदयनराजेंना न घाबरता टक्कर देणारा, लाखात मते घेणारा ठाकरेंचा वाघ शिंदे गटात सामील
नशीब! पेंटरवर होतं लाखोंचं कर्ज, घर विकायच्या दोन तास आधी लागली ‘एवढ्या’ कोटींची लॉटरी

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now