Share

वहिनी आणि दीर आढळले रक्तबंबाळ अवस्थेत; दीराच्या प्रायव्हेट पार्टमधून येत होतं रक्त

सध्या आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे क्राईम घडत असतात. काही क्राईम साधे असतात तर काही हादरा बसेल असे असतात, ज्यात माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या असतात. अशीच एक हादरा बसेल अशी घटना समोर आली आहे. दीराच्या प्रायव्हेट पार्टचा वहिनीने चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

संबंधित घटना ही उत्तर प्रदेश मधील कानपूर जिल्ह्यात घडली आहे. एका महिलेने आपल्या दीराच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला, त्यामुळे दीर रक्तबंबाळ झाला. त्यानंतर महिलेने देखील तिचा चाकूने हात कापून घेतला. या विचित्र घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

दीराला जखमी केल्यानंतर, महिलेनं स्वत:च्या हाताच्या नसाही चाकूने कापल्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर लगेचच खोलीभर रक्त पसरले. घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी महिलेचं लग्न कानपूर मधील बिल्होर येथील एका कुटूंबातील तरुणासोबत झाले होते. लग्नानंतर तरुणाची मानसिक स्थिती बिघडली. त्यानंतर या नवविवाहित महिलेचे तिच्या पतीच्या कुटूंबीयांशी वाद सुरू झाले. याच दरम्यान, या महिलेचे त्याच्या दीराशी जवळीकता निर्माण झाली.

या वहिनी आणि दीरामधील अनैतिक संबंध कुटूंबीयांना माहिती झाले. मात्र त्यांच्या संबंधाला कोणीच नकार दिला नाही. माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी महिला आणि तिच्या दीरामध्ये खटके उडू लागले. काही गोष्टींवरून त्यांच्यात मतभेद झाले. याच वादातून वहिनी म्हणणाऱ्या या महिलेनं तिच्या दीराच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला.

महिलेच्या सासूने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ज्या दिवशी घडली होती, तेव्हा तिचा हा धाकटा मुलगा खोलीत झोपला होता. त्याच वेळी तिच्या या सुनेने त्याच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला. यामुळे तो रक्तबंबाळ झाला. त्याच वेळी सुनेने देखील चाकूने तिच्या हाताची नस कापून घेतली.

क्राईम

Join WhatsApp

Join Now