आपल्या कामाप्रती आणि समाजाप्रती असलेलं प्रेम फारच कमी लोकांमध्ये पाहायला मिळत. कर्तव्याची जाणीव ठेवून आणि अनेक गोष्टींचा त्याग करून समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द गौरवण्यासारखी आहे. गुजरातमध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय अस्मिता कोलाडिया (Asmita Koladia) यांनी कोविड-19 लसीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि समाजाप्रती आपले कर्त्यव आणि प्रेम सिद्ध केले आहे.(Vaccination is carried out from village to village)
अस्मिता कोलाडिया आपल्या 8 महिन्यांच्या मुलीला घेऊन लस देण्यासाठी गावोगाव जाते. रोज सकाळी अस्मिता तिच्या स्कूटीवरून निघते. जियांशी ही 8 महिन्यांची मुलगी तिच्या छातीभोवती गुंडाळलेली असते. अस्मिता राजकोटच्या सरदार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोधिडा उपकेंद्राशी संलग्न आहे.
लोकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगून त्यांना लस घेण्यास प्रवृत्त करते. लोधिडा गावातील एका वृद्ध महिलेलाही त्यांनी समजावले होते. यापूर्वी वृद्ध महिला ही लस घेण्यास नकार देत होती. अस्मिता तिच्या कामासाठी इतकी समर्पित आहे की ती लस देण्यासाठी लोकांपर्यंत तसेच शेतात पोहोचते.
अस्मिता आणि त्यांच्यासारख्या अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांमुळेच लसीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. देशात जलद लसीकरणाचे सुरक्षा चक्र लवकरात लवकर पूर्ण केले जात आहे. लोधिडा पीएचसीच्या सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्याने अस्मिताची तुलना झाशीच्या राणी लक्ष्मीबाईशी केली आहे.
ते म्हणाले की, ज्याप्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या मुलाला घेऊन रणांगणावर गेली, त्याचप्रमाणे अस्मिता आपल्या 8 महिन्यांच्या चिमुरडीसह कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपले कर्तव्य बजावत आहे. अस्मिता आपल्या लहान मुलीला आपल्या कामात अडथळा मानत नाही. कामाप्रती समर्पण आणि मुलीमधील प्रेम यातील समतोल अशा प्रकारे समजू शकतो की लस देतानाही मुलगी आईच्या छातीला चिकटून राहते.
गेल्या महिन्यात मोहीम सुरू झाल्यापासून, 15 ते 18 वयोगटातील 65 टक्के किशोरवयीन मुलांनी कोविड-19 लसीचा पहिला डोस घेतला आहे. आरोग्य कर्मचारी एका वृद्ध महिलेच्या घरी लस देण्यासाठी 6 वेळा आले, पण ती तयार झाली नाही. शेवटी आरोग्य अधिकारी डॉ.एम.एस.आळी यांनी समजवल आणि अस्मितानेच त्यांचे लसीकरण केले.
महत्वाच्या बातम्या-
आमदार नितेश राणेंना जामीन मंजूर, न्यायालयाच्या ‘या’ अटी पाळाव्या लागणार
पुन्हा एकदा सबाचा हात पकडताना दिसला ह्रतिक रोशन; कॅमेरा पाहताच लपवले तोंड, पहा व्हिडिओ
पहले हिजाब, फिर किताब; हिजाब प्रकरणावरून महाराष्ट्रातील मुस्लिम तरूणांची बॅनरबाजी, म्हणाले..