Share

uttar pradesh : प्रेयसीच्या घरच्यांनी दिला लग्नाला नकार; तरूणाने फेसबूकवर Live व्हिडीओ करत चिरला स्वतःचा गळा

young boy

uttar pradesh young boy facebook live for girl  | असे म्हणतात प्रेम आंधळे असते ते कधी कोणासोबत होईल हे सांगता येत नाही. पण अशा प्रेमातून अनेक धक्कादायक घटनाही घडत असतात. एकतर्फी प्रेमात जीव गमावल्याच्या अनेक घटना समोर येत असतानाच आता उत्तर प्रदेशमधून भयानक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील एका तरुणाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ हैदराबादमधून समोर आला आहे. प्रेमात फसवणूक झालेल्या तरुणाने ग्राइंडर मशिनने स्वत:चा जीव घेण्याच्या प्रयत्न केला आहे. एका तरुणाने स्वत:चाच गळा कापला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

महाराजगंज जिल्ह्यातील पुरंदरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणाचे गावातीलच एका तरुणीवर प्रेम होते, मात्र या गोष्टीचा मुलीच्या कुटुंबीयांना प्रचंड राग होता. त्यांनी स्पष्टपणे तरुणाला या लग्नासाठी नकार दिला होता. इतकंच नाही, तर तरुणाला अनेकदा धमक्याही दिल्या होत्या.

अशात त्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी या तरुणाची धडपड सुरुच होती. चांगली नोकरी मिळाली तर आपल्याला त्या तरुणीशी लग्न करता येईल असा विचार त्या तरुणाच्या मनात आला. त्यामुळे त्याने उत्तर प्रदेशहून थेट हैदराबाद गाठले. अशात मुलीचे लग्न तिच्या कुटुंबीयांनी निश्चित केले होते.

तरुणीला तरुणाशी बोलू नको, अशीही सूचना देण्यात आली होती. १० दिवसांपासून तरुणीशी बोलता आलं नाही आणि लग्न होणार असल्याचे समजताच तरुण अस्वस्थ झाला. यानंतर तो फेसबुकवर लाईव्ह आला आणि त्याने त्याचे नाव आणि त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबीयांची सविस्तर माहिती दिली. यानंतर ग्राइंडर मशिनने स्वत: जीव घेण्याचा प्रयत्न केला.

ग्राइंडर मशिनचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सगळेच हैराण झाले आहेत. गंभीर अवस्थेत तरुणाला हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
पैशांसाठी काहीही! घटस्फोटाच्या चर्चांनंतर शोएब मलिक आणि सानिया मिर्झा पुन्हा एकत्र
Siddhant Veer Suryavanshi : जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झालेल्या अभिनेता सिद्धांतची लास्ट पोस्ट व्हायरल; म्हणाला, ‘माझ्या 3 जीवनावश्यक..
कुत्रा चावला तर मालकालाच बसणार भूर्दंड, भरावा लागणार १० हजार रुपये दंड; काय लाड करायचे ते आपल्या घरी

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now