अनाथ मुलांना आधार दिल्याच्या अनेक बातम्या आपण नेहमीच वाचतो. मात्र एका पोलिसाने पाच लेकरांना हक्काचं घर दिल्याचे तुम्ही कुठही वाचलं नसेल,मात्र तस घडलं आहे. आईने पतीची हत्या केल्याने, आई तुरुंगात तर वडीलांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा शोध घेणाऱ्या पोलिसानेच त्यांच्या अनाथ मुलांना आधार दिला. (us cop adopts five kids whose mother killed father)
जाणून घ्या नेमकं प्रकरण काय… ही घटना वॉशिंग्टनमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. एमिली एज्रा असे या आरोपी महिलेचे नाव आहे. पॉल असे तिच्या पतीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 14 जानेवारी 2022 रोजी उघडकीस आली आहे.
काही दिवसांपूर्वी एमिली एज्रा आणि पॉल यांचा घटस्फोट झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये काही कारणावरुन वादावादी प्रचंड झाली. त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापाच्या भरात महिलेने नवऱ्यावर गोळीबार केला. यात पतीचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना मिळाली. अमेरिकेतील पोलिस अधिकारी निकोलस क्विंटाना यांना या घटणेबाबत फोन आला. त्यानंतर त्यांनी थेट घटनास्थळी जाऊन धाव घेतली. घडल्या प्रकारची सविस्तर माहिती घेतली. त्यावेळी त्यांना तिथे पाच मुले एका कोपऱ्यात घाबरुन बसली असल्याचे दिसले.
दरम्यान, अशावेळी या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यातील ‘आई’ जागी झाली.या प्रकरणावर पत्नीशी दीर्घ काळ चर्चा केल्यानंतर, निकोलस यांनी पाचही मुलं दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. सध्या या पोलिस आधिकारऱ्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतं आहे.
या पोलिस अधिकाऱ्याच्या रूपाने या पाच अनाथ मुलांना मायेच छत्र मिळालं आहे. या प्रकरणी सध्या आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर पोलिस या घटनेचा आणखी कसून तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
शिवसेनेला मोठा धक्का! आयकर विभागाच्या रडारवर ‘हा’ बडा नेता, IT विभागाने घरी मारली धाड
ना बायको ना मुलगा, मग सलमानच्या २३०० कोटींच्या संपतीचं काय होणार? सलमानने केला खुलासा
‘या’ अभिनेत्रीच्या हाती लागला अक्षय कुमार आणि इमरान हाशमीचा १०० कोटी बजेटवाला चित्रपट
नवाब मलिकांना अटक होताच क्रांती रेडकर आक्रमक; म्हणाल्या, शत्रु राख में मिले..; पहा व्हिडीओ