Share

urvashi rautela : ऋषभ पंतचा पत्ताकट, साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात पडली उर्वशी रौतेला?

Urvashi Rautela, Rishabh Pant,

urvashi rautela reveled who is mr rp  | बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत यांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली असते. अनेकदा सोशल मीडियावर उर्वशी अशा काही पोस्ट करते, त्यावरुन ती पंतच्या प्रेमात आहे की काय असे वाटते. तिने अनेकदा मुलाखतीमध्ये मिस्टर आरपीचे नाव घेतले आहे. तिचा हा मिस्टर आरपी म्हणजे ऋषभ पंत आहे, असे चाहते म्हणताना दिसत आहे.

अशात आता उर्वशीनेच ‘मिस्टर आरपी’चा खुलासा केला आहे. एका मुलाखतीदरम्यान उर्वशीने आरपी नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला होता. एवढेच नाही तर ‘मिस्टर आरपी’ सोबतचे नाते तुटल्याची संपूर्ण कहाणीही त्यांनी सांगितली. मात्र, तिने आरपीचे पूर्ण नाव सांगितले नाही.

त्यामुळेच या मुलाखतीची क्लिप पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी उर्वशी रौतेला ऋषभ पंतचा उल्लेख करत असल्याचा अंदाज लावला. त्यानंतर, अभिनेत्रीच्या सर्व पोस्ट पंतशी जोडल्या गेल्या होत्या. मात्र, आता उर्वशीने या सर्व अफवांना पूर्णविराम देत तिचा मिस्टर आरपीचा खुलासा केला आहे.

अभिनेत्रीने सोशल मीडियावर एका व्यक्तीसोबतचा तिचा फोटो पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये साऊथचा अभिनेता राम पोथीनेनीला टॅग केले आहे. एवढेच नाही तर अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये Love हा हॅशटॅगही वापरला आहे. त्यामुळे हाच तो आरपी असे म्हणत चाहते तिच्या पोस्टमध्ये कमेंट करत आहे.

उर्वशीच्या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘अच्छा, हा आरपी आहे. तर एकाने लिहिले की, ऋषभ भाई बघत आहात का? आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, आता ऋषभला मिस करू नका?’ एका नेटकऱ्याने लिहिले की, ऋषभचे आता काय होणार?

२०१८ मध्ये पंत आणि उर्वशी रौतेला रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. दोघेही अनेकदा लंच-डेटवर दिसले. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. मात्र, काही वेळानंतर पंतने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्याची बातमी सोशल मीडियावर आली. मात्र, दोघांनी परस्पर संमतीने एकमेकांना ब्लॉक केल्याचे नंतर समोर आले होते.

महत्वाच्या बातम्या-
bjp : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक बंड?, भाजप नेत्याच्या खळबळजनक दाव्याने उडाली खळबळ
abdul sattar : डोक्यात सत्तेची हवा..! “तुम्ही दारू पिता का?” पीक पाहणी दौऱ्यादरम्यान मंत्री अब्दुल सत्तारांचा प्रश्न?
Rohit Sharma : VIDEO: रोहित शर्माने लाईव्ह मॅचमध्ये काढली पॅन्ट, लाजिरवाणा प्रकार कॅमेऱ्यामध्ये झाला कैद

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now