Share

urvashi rautela : चित्रपट फ्लॉप तरी अलिशान आयुष्य जगते उर्वशी, इतका पैसा येतो तरी कुठून? 

Urvashi Rautela

urvashi rautela earning money by advertising बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला ही सोशल मीडियावर खुप सक्रीय असते. ती अनेकदा वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. ती तिच्या फॅशनमुळेही खुप चर्चेत असते. त्यामुळे तिचा चाहतावर्गही खुप मोठा आहे.

तसेच उर्वशी तिच्या व्यवसायिक आणि खाजगी आयुष्यामुळेही खुप चर्चेत असते. तिचे नाव सतत भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतशी जोडले जाते. दोघेही आधी रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांचे नंतर ब्रेकअप झाले, असे म्हटले जाते.

तसेच ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात वाद झाला होता. त्यामुळेही दोघांचे नाते खुप चर्चेत आले होते. उर्वशी रौतेलाने मिस्टर आरपी माझ्यासाठी १० तास थांबला असे म्हटले होते. तर ऋषभ पंतने उर्वशी हे फक्त हेडलाईन्समध्ये जागा मिळवण्यासाठी करत आहे, असे म्हटले होते.

त्यानंतर दोघांमध्ये सोशल मीडियावर वाद झाला होता. उर्वशी ही तिच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. कारण ती अभिनेत्री म्हणून तिला इतके यश मिळाले नाही. तिने ग्रेट ग्रँड मस्ती, हेट स्टोरी ४, पागलपंती, सनम रे, सिंग साब दी ग्रेट असे चित्रपट केले आहे. पण तिचा एकही सिनेमा हिट ठरला नाही.

सिनेमे फ्लॉप ठरवूनही ती लक्झरी आयुष्य जगताना दिसून येते. त्यामुळे ती पैसे कमावते कुठून असा प्रश्नही अनेकांना पडत असतो. मिळालेल्या माहितीनुसार, उर्वशीकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. ती अनेक चित्रपटांमध्ये आयटम साँग करताना दिसून आली आहे. त्या बदल्यात तिला करोडो रुपये मिळतात.

तसेच उर्वशी खुप सुंदर आहे. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या तिला जाहिरातीच्या ऑफर देतात. एका जाहिरातीसाठी ती जवळपास ५० लाख रुपये घेते.  तसेच ती सोशल मीडियावरील पोस्टसाठी सुद्धा लाखोंमध्ये पैसे घेते. त्यामुळे अभिनयातील करिअप फ्लॉप गेले असले तरी उर्वशी अलिशान आयुष्य जगताना दिसून येते.

महत्वाच्या बातम्या-
amol kohle : अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसला ठोकणार राम राम? राष्ट्रवादीच्या ‘त्या’ निर्णयामुळे चर्चांना उधाण
गर्लफ्रेंडचे पत्र वाचताच अक्षय केळकर ढसाढसा रडला, म्हणाला, “आठ वर्षांचं प्रेम आहे माझं पण…
भगवान कृष्णाची भूमी द्वारका मशिदी अन् दर्ग्यांनी वेढली; एका क्षणात केले सर्वकाही उद्धवस्त…

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now