Share

बाळाचा लंगोट बदलण्यापासून ते माझ्या.., उर्मिला निंबाळकरची पतीबाबतची ‘ती’ पोस्ट चर्चेत

urmila nimbalkar

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. याद्वारे ती नेहमी अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. यामध्ये ती कधी तिचे किंवा तिचा पती सुकीर्त आणि मुलासोबतचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते. नुकतीच उर्मिलाने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने पती सुकीर्तचे भरभरून कौतुक केले आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती तिचा पती सुकीर्त गुमस्थे आणि मुलाचा एक फोटो शेअर केला. यासोबत तिने लिहिले की, ‘त्याला लाज नाही वाटत, बाळाला पोटाशी बांधून फिरायला न्यायची. बघतात फिरताना लोक नजर रोखून. बिघडलीय आत्ताची पिढी, असंही मनात म्हणत असतील. पण बाळाचे लंगोट बदलण्यापासून ते माझ्या शुटिंगच्या दरम्यान त्याला संपूर्णपणे सांभाळण्यापर्यंत सुकीर्त गुमस्थे सगळं मनापासून आनंदाने करत असतो आणि हे सगळं स्वतःचं उत्तमरित्या करिअर सांभाळून’.

‘जेव्हा आयुष्याचा जोडीदार असं म्हणलं जातं तेव्हा बाळ सांभाळण्याची जबाबदारी मात्र फक्त स्त्रीवर येऊन पडते. दूधासाठी बाळाला आईच हवी पण इतर सर्व कामे, पुरुष उत्तम करु शकतात. ज्यानं स्त्रीला पुरेशी विश्रांतीही मिळते आणि तिच्या करिअरकडे तिला लक्ष देण्यासाठी थोडी उसंतही’.

‘मी आणि सुकीर्त एका प्रायोगिक नटकाच्या संस्थेत भेटलो. तेव्हाही तो स्त्रियांच्या प्रश्नाकडे अतिशय कळकळीने, आदराने पहायचा. लग्न झाल्यानंतरही उचित ठिकाणी त्यानं स्वतःच्या आयुष्यातील प्रत्त्येक स्त्रीची बाजू घेतली. त्याच्या आईची बाजू, सहकारी, मी, माझी आई, मैत्रीण सर्वांचं म्हणणं अतिशय सहानुभूतीपूर्वक त्याला समजून घेता येतं’.

‘जेव्हा बाळ झालं तेव्हाही पठ्ठ्यानं साथ सोडली नाही. हे पुरुषाचं खरं पुरुषत्व आहे. सुकीर्त गुमस्थे असा अप्रतिम असल्याबद्दल धन्यवाद. आपण नेहमी बोलत असलेल्या समानतेसाठी तुझ्यासारख्या अनेक पुरुषांची गरज आहे’. दरम्यान, उर्मिलाची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

दरम्यान, उर्मिला आणि सुकीर्त यांची एका नाटकादरम्यान ओळख झाली. नंतर त्यांच्या दोघांत मैत्री वाढली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ७ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 9 फेब्रुवारी २०१३ रोजी ते दोघे विवाहबंधनात अडकले.

उर्मिलाने ‘एक तारा’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘हायवे’, ‘सनई चौघडे’ अशा चित्रपटात काम केले. ‘दिया और बाती हम’ या मालिकेद्वारे तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ‘मेरी आशिकी तुमसे ही’, ‘दुहेरी’ अशा मालिकेत तिने काम केले. ‘दुहेरी’ या मालिकेतील मैथिली या भूमिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

महत्त्वाच्या बातम्या :
प्रसिद्ध जोडप्याच्या ब्रेकअपनं बॉलिवूड हादरलं, तीन वर्षानंतर नातं संपल्यामुळे चाहतेही झाले दु:खी
राजामौलींनी प्रेमासाठी तोडली सगळी बंधने, घटस्फोट झालेल्या ‘या’ फॅशन डिझायनरसोबत केलं आहे लग्न
रामचरणची दरियादिली! RRR चे यश पाहून झाला खुश, पुर्ण टीमला घरी बोलावून दिलं ‘हे’ महागडं गिफ्ट

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now