आपल्या भारताचा आवाज असलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोककळा पसरली होती. मुंबईतील शिवाजी पार्कवर लता दीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याच दरम्यान बॉलिवूडसह राजकीय जगतातील अनेक दिग्गजही उपस्थित होते. यामध्ये अभिनेता शाहरुख खानही लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी आला होता.
याच दरम्यान शाहरुख खानने लता दीदींच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना वाचली आणि फुंक देखील मारली. त्याची हीच प्रार्थना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते त्याला ट्रोल करू लागले आणि शाहरुखने त्याच्यावर थुंकले असे देखील बोलले जाऊ लागले आहे.
आता या चर्चेत आणखी एका व्यक्तीने आपले मत मांडले आहे. ही व्यक्ती म्हणजे शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर होय. याचबरोबर उर्मिलाची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ती म्हणाली की, “एक समाज म्हणून आपण इतके बिघडलो आहोत की प्रार्थना करणे म्हणजे थुंकणे आहे असे वाटते. तुम्ही एका अभिनेत्याबद्दल बोलत आहात ज्याने विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर पोहोचले आहे आणि हे खरोखरच खूप वाईट आहे.”
त्याचबरोबर उर्मिलाच्या व्यतिरिक्त शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही शाहरुख खानचे समर्थन केले. तसेच ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देखील दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, “अशा लोकांना लाज वाटत नाही. प्रसंग काय आपण बोलतो काय. जे अशा प्रसंगी महान अभिनेत्याला ट्रोल करत आहे.”
तसेच ते पुढे ही म्हणाले की, “लताजी एक महान व्यक्ती होत्या. त्यांच्या शरीरातून आत्मा गेला आहे. पण त्या आपल्या सर्वांमध्ये अजूनही जिवंत आहेत. काही लोक म्हणतात की, त्यांचे स्मारक होणे सोपे नाही. लताजी राजकारणी नव्हत्या. लता दीदी सर्वांच्या हृदयात आहेत.”
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क येथे ठेवण्यात आले होते. याच दरम्यान अभिनेता शाहरुख खानही लता मंगेशकर यांना अंतिम निरोप देण्यासाठी पोहोचला. यादरम्यान शाहरुख खानने इस्लामिक रितीरिवाजातून लता मंगेशकर यांच्यासाठी हात पसरून एक दुआ वाचली होती. दुआ करून झाल्यानंतर लता मंगेशकर यांच्या पायाजवळ फुंकर मारली होती, जी अनेकदा दुआनंतरची प्रथा आहे. यासाठी त्याला सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे.
त्याचबरोबर अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. त्याचबरोबर भारतीय संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होते. जावेद अख्तर, श्रद्धा कपूर, अमीर खान तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार देखील यावेळी दिसून आले.
महत्वाच्या बातम्या
अखेर ठरलं! रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बांधणार लग्नगाठ? ‘या’ ठिकाणी होणार थाटामाटात लग्न
‘भांडून लता दीदींचं अंत्यदर्शन घेतलं’; अभिनेत्रीची पोस्ट तूफान व्हायरल, वाचा नेमकं काय घडलं?
मी तीन वेळा तयार झालो होतो पण.., धर्मेंद्र यांनी सांगितले लता दीदींच्या अंत्यसंस्काराला न येण्याचे कारण
“कर्तबगार माणसांच्या घरात पाळणा हालतो, वांझोट्या शिवसेनेला लेकरं कशी होणार?”