बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशन आणि बोल्ड कपड्यांमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. उर्फीच्या उधळपट्टीच्या फॅशनची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. तिच्या बोल्ड कपड्यांमुळे तिला ट्रोलिंगचा शिकार व्हावे लागले आहे, तरीही उर्फी या ट्रोलर्सना महत्त्व देत नाही.
बिंदास स्टाईलमध्ये राहणारी उर्फी एकामागून एक तिचे बोल्ड ड्रेसमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. उर्फीचा डान्स आणि ग्लॅमरस लूक सगळ्यांनीच पाहिला आहे, पण तिचे बालपण अडचणीत गेले. उर्फीने स्वतः एका मुलाखतीदरम्यान या गोष्टींचा उल्लेख केला.
बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडल्यानंतर उर्फीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की तिचे बालपण खूप कठीण होते. ती नैराश्य आणि मानसिक छळातून गेली आहे. उर्फीने सांगितले की, जेव्हा ती 11वीत होती तेव्हा तिच्या एका मित्राने तिचे फोटो एका प्रौढ साइटवर अपलोड केले होते.
त्यावेळी तिच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्याला चुकीचे मानले आणि तिला साथ दिली नाही. तिला बोलण्याची संधीही मिळाली नाही. त्यावेळी मला दोषी मानले जात होते. मी पोर्न स्टार म्हणून गुपचूप काम करत असल्याची तिच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांची समजूत होती.
कठीण प्रसंगी मला साथ देण्याऐवजी माझ्या कुटुंबाने माझ्यावर आरोप केले. मला बोलूही दिले नाही. माझ्या वडिलांनी माझे मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले. नातेवाईकांना तिचे बँक खाते तपासायचे असल्याचे तिने सांगितले. त्यांना वाटायचे माझ्या बँक खात्यात पैसे लपवलेले आहे.
मी चुकीचे काम करते त्याला नातेवाईक पॉर्न स्टार म्हणायचे. तिला दोन वर्षे नजरकैदेत ठेवण्यात आले. तिला घराबाहेर हाकलून दिले. उर्फी जावेदने सांगितले की, तिचे नातेवाईक आणि आजूबाजूचे लोक तिच्याबद्दल अशा घाणेरड्या गोष्टी बोलायचे की तिला तिचे नावही आठवत नसायचे.
जेव्हा वडील तिला मारायचे तेव्हा ती काहीच बोलू शकत नव्हती, त्यावेळी माझ्याकडे ते सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत बसायचे सुद्धा नाही. एकाही मुलीला माझ्यासोबत येण्याची परवानगी नव्हती. या घटनेनंतर माझा स्वतःवर विश्वास बसला. आवाज उठवायला शिकले.
उर्फी जावेदने सांगितले की, हे सर्व माझ्यासोबत दोन वर्षे चालले. या छळामुळे मी माझे नावही विसरले होते. उर्फीने सांगितले की, मी ज्या परिस्थितीतून गेले आहे, देवाने अशी परिस्थिती कोणत्याही मुलीसमोर आणू नये. आपल्या कुटुंबातील मुलींना बोलण्याचे स्वातंत्र्य नसल्याचे तिने सांगितले.
मला नेहमी सांगितले जायचे की मुलींना आवाज नसतो, फक्त पुरुष जे बोलतात त्यावर विश्वास ठेवावा लागतो. उर्फीने सांगितले की, मी दोन वर्षे सर्व काही सहन केले. घरातून बाहेर पडल्यावर बोलायला शिकले. मग मला कळलं की मुलीही बोलू शकतात.
उर्फीने मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, घरची परिस्थिती पाहून ती आपल्या दोन बहिणींसह घरातून पळून दिल्लीत आली. आठवडाभर दिल्लीच्या एका पार्कमध्ये रात्र काढली आणि कशीतरी कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळवली. काही दिवसांनी वडिलांनी दुसरे लग्न केल्याचे कळले, त्यानंतर आई आणि आणखी दोन भावांची जबाबदारीही तिच्या खांद्यावर आली.
उर्फी जावेदला बिग बॉस OTT मधून ओळख मिळाली. बिग बॉस ओटीटीमध्ये स्पर्धक म्हणून सामील झाली. उर्फीने शोमध्ये आपला ठसा उमटवला, तरीही तिला लवकरच शोमधून बाहेर काढण्यात आले. बिग बॉस शोनंतर उर्फी सतत सोशल मीडियावर असते. तीच्या फॅशनेबल कपड्यांबद्दल तिच्याबाद्दला चर्चा चालू असतात.
महत्वाच्या बातम्या
राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराला हत्येच्या आरोपाखाली कोर्टाने ठोठावली १० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा
नादच! रिक्षाचालकाने घरीच बनवली जबरदस्त बॉडी, वर्कआऊटचा व्हिडीओ पाहून अवाक व्हाल
बच्चू कडूंच्या अपघाताबाबत अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप, म्हणाले, भाजपच्या व्यक्तीकडून..