Share

VIDEO : समुद्रातील शिंपल्यांपासून उर्फीने तयार केला बिकीनी टॉप; ट्रोलर्स म्हणाले, ‘देवाला तरी घाबर’

Urfi Javed

बिग बॉस फेम उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर तिच्या विचित्र लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. आताही उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील उर्फीच्या लूकची सध्या सर्वत्र चर्चा असून यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. तर सोशल मीडियावर होणारी ही ट्रोलिंग पाहता उर्फीनेही एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले.

उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये उर्फीचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अंदाज दिसून येत आहे. उर्फीने समुद्रात मिळणाऱ्या शिंपल्यांपासून बिकीनी टॉप तयार केला आहे. यासोबत तिने सी-थ्रू फॅब्रिकचा एक पारदर्शक कापड गुंडाळला आहे. उर्फीचा हा व्हिडिओ समोर येताच तिचा सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले.

एका नेटकऱ्याने तिच्या या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले की, ‘देवाला तरी घाबर’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘हे काय बघावं लागत आहे. बरं झालं मी आंधळा आहे’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘इतकंपण करणं बरोबर नाही मॅडम’. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘हिचं तोंड बघून दया येत आहे’.

अनेकजण उर्फीने काही कपडेच परिधान केले नसल्याचे सांगत तिच्यावर प्रचंड टीका करत आहेत. तर या ट्रोलर्सना उत्तर देत उर्फीने तिच्या इन्स्टा स्टोरीला एक पोस्ट शेअर केली. यामध्ये तिने लिहिले की, ‘सर्वजण मुर्खांसारखं बोलणं बंद करा. होय मी स्कीन कलरचा अंडरगारमेंट परिधान केला आहे. तुमच्यासारखे लोक जरा तुमचा कॉमन सेन्स आणि डोळ्यांचा वापर करा’.

उर्फी अशा कपड्यांमध्ये दिसणे हे पहिल्यांदाच झालं असं नाही. तर यापूर्वीही तिने अनेकवेळा असे विचित्र कपडे घालून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. तसेच तिच्या या अशा लूकमुळे तिला अनेकांच्या टीकेलाही सामोरे जावे लागले. असे असले तरी उर्फी तिच्या कपड्यांबाबत नवनवीन प्रयोग करताना दिसून येते.

उर्फी नेहमी ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत असली तरी प्रसिद्धीच्या बाबतीतही ती काही मागे नाही. उर्फीची फॅन फॉलोइंगही दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. इन्स्टाग्रामवर तर तिचे ३ मिलियन फॉलोअर्स आहेत. नुकतीच यानिमित्ताने ती तिच्या मित्रांसोबत हा आनंद साजरा करताना दिसून आली होती.

महत्त्वाच्या बातम्या :
धक्कादायक! साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने सोडली फिल्म इंडस्ट्री, आता करणार शौचालय साफ
अंडरग्राऊंड झालेले गणेश नाईक प्रकटले, लैगिंक छळाच्या आरोपांवर म्हणाले, काहींना राजकारणात…
‘तो’ फोटो शेअर करत केदार शिंदेंनी राज ठाकरेंंचे केले कौतुक, म्हणाले, ‘एक अव्वल कलाकार’

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now