मागील काही महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर बिग बॉस ओटीटी सुरू झाले होते. याच दरम्यान या शोमध्ये स्पर्धक म्हणून उर्फी जावेदने देखील सहभाग घेतला होता. तेव्हापासून उर्फी नेहमी चर्चेत असते. त्याचबरोबर तिच्या कपड्याच्या पेहरवामुळे ही ती नेहमी चर्चेत असते. त्यामुळे ती अनेक वेळा ट्रोल देखील झाली आहे.
इतकेच नव्हे तर, उर्फीने एकदा सांगितले होते की, तिला मुस्लिम मुलाशी लग्न करायचे नाही. पण उर्फी आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या ती एका व्यक्तीला डेट करत आहे. याबद्दलच थोडीशी माहिती आज आपण या बातमीमध्ये पाहूया.
माध्यमांच्या वृत्तानुसार, उर्फी जावेद सध्या एका इंडो-कॅनडियन गायकाला डेट करत आहे. त्याचे नाव कुंवर असे आहे. या बातमीतील तथ्य: तेव्हा समजली जेव्हा इंडो-कॅनेडियन गायक कुंवरने उर्फीसोबतचा फोटो शेअर केला. सध्या या दोघांच्या नात्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे.
या फोटोमध्ये उर्फी कुंवरसोबत रोमँटिक पोजमध्ये दिसली होती. हा फोटो पोस्ट करत कुंवरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘असे बरेच काही आहे, जे तयार होत आहे.’ कुंवरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
https://www.instagram.com/p/CZ_-NEflIim/?utm_medium=copy_link
कुंवर आणि उर्फीचा हा फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी उर्फीला डेट करण्याबाबत प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला माहित आहे की तू माझ्यावर प्रेम करतोस.’ याअगोदरही कुंवरने उर्फीच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या पोस्टवर कमेंट केली होती. ज्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे. त्याने कमेंट करत लिहिले होते की, ‘हॅप्पी व्हॅलेंटाईन डे उर्फी जी.’
आपल्या सर्वांना माहितीच आहे की, उर्फीने २०१६ मध्ये ‘बडे भैया की दुल्हनिया’ या मालिकेद्वारे टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. उर्फी कट्टर इस्लामिक विचारधारा असलेल्या लोकांबद्दल आपले स्पष्ट मत मांडते. यासाठी ती प्रसिद्ध देखील झाली आहे. उर्फी तिच्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. तसेच ती ‘बिग बॉस ओटीटी’ ही सहभागी झी होती. मात्र तिला या शोमध्ये जास्त दिवस राहता नाही आले. या शोमधून बाहेर आल्यापासून ती आपल्या वेगवेगळ्या स्टाइलने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
कुंवरच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर त्याने अनेक हिट गाणे गायली आहेत. या गाण्यांमध्ये ‘बेवफा’ या गाण्याचाही समावेश आहे. त्याचबरोबर कुंवरने अफसानासोबतही काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच कुंवरचा ‘अॅटिट्यूड’ हा लेटेस्ट ट्रॅक रिलीज झाला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे.