उर्फी जावेद (Alias Javed) प्रत्येक वेळी तिच्या बोल्ड लूकने सर्वांना चकित करत असते. तिची विचित्र फॅशन अनेकवेळा लोकांच डोकं चक्रावून सोडते. दरम्यान, उर्फीने पुन्हा एकदा आपला नवा लूक तयार केला आहे जो सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आहे. आम्हाला खात्री आहे, तिचा हा नवा लूक पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.(urfi-javed-dances-without-clothes-watch-the-video)
‘बिग बॉस ओटीटी’ स्पर्धक उर्फी जावेदने लेटेस्ट लूकचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यावेळी उर्फीने खरोखरच सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याचे व्हिडिओ पाहून समजते. उर्फी जावेदने तिच्या शरीरावर फक्त फोटो चिकटवून आपला नवा लूक तयार केला आहे.
व्हिडीओ नीट पाहिल्यास आपल्याला समजते की, तिने तिच्या अंगावर स्वतःचे अनेक फोटो चिटकवलेले आहे. यादरम्यान ती कॅमेऱ्यासमोर डान्स करताना दिसत आहे. दुसरीकडे, उर्फीने खास मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. तिने ब्राऊन लाइट ग्लॉसी लिपस्टिक, लाईट आयशॅडो, आयलायनर आणि मस्करा लावून तिचा मेकअप खास बनवला आहे. हेअरस्टाईलबद्दल बोलायचे झाले तर तिने मऊ कुरळे केस मोकळे सोडले आहेत.
आपला अनोखा लूक शेअर करताना उर्फीने कॅप्शनमध्ये सांगितले आहे की तिला ही कल्पना कुठून आली. अभिनेत्रीने लिहिले की, ही कल्पना इंटरनेटवर पाहिली. त्यामुळे हा लुक ट्राय केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या सतत प्रतिक्रिया येत आहेत. त्याचबरोबर त्यावर कमेंट करून यूजर्स तिला ट्रोलही करत आहेत.
याआधीही उर्फीने अशी विचित्र शैली दाखवलेली आहे. एकदा तिने अंगावर अॅल्युमिनियम फॉइल चिकटवून तिचा ड्रेस बनवला होता. ज्यासाठी तिला ट्रोलही करण्यात आले होते. अलीकडेच उर्फी टॉपऐवजी गळ्यात लोखंडी साखळी घालून फिरताना दिसली. उर्फीला नवीन आणि असामान्य फॅशन फॉलो करायला आवडते. पण तिचा फॅशन सेन्स लोकांच्या समजण्याच्या पलीकडचा आहे.
उर्फी जावेद ही लखनौची रहिवासी आहे. तिने 2016 मध्ये सोनी टीव्हीच्या शो ‘बडे भैया की दुल्हनिया’ मधील अवनी पंतच्या भूमिकेतून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच वेळी, 2016-17 मध्ये उर्फीने स्टार प्लसच्या चंद्र नंदनी शोमध्ये छायाची भूमिका साकारली होती. मात्र उर्फीने मेरी दुर्गामधील आरती या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली. उर्फीच्या यादीत ‘सात फेरो की हेरा फेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’, ‘डायन’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी’ यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
राजकीय भूकंप होणार? भाजपा खासदार आणि संजय राऊतांमध्ये ३ तास खलबत; नेमकं काय घडतंय?
कौतुकास्पद! दीपिका पादुकोणने विदेशात वाढवला भारताचा मान; मिळवला हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
या मुस्लिम व्यक्तीने लटकावला पशुपतिनाथ मंदिरात ३७०० किलोचा सर्वात मोठा घंटा, मोठे-मोठे इंजिनीअर झाले फेल
पुन्हा लग्नबंधनात अडकणार UPSC टॉपर टीना डाबी, जाणून घ्या कोण बनणार नवरदेव