Share

दु्य्यम खाते मिळाल्याने नाराज? दादा भुसे स्पष्टच बोलले, म्हणाले, मला मिळालेल्या मंत्रीपदामुळे मी…

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर लगोलग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप देखील केले. त्यामध्ये ठाकरे सरकारमध्ये कृषिमंत्री राहिलेल्या दादा भुसे यांना दुय्यम दर्जाचे मंत्रीपद देण्यात आल्याने ते नाराज आहेत, अशी चर्चा रंगली होती. (Upset about getting a secondary account? Dada Bhuse spoke clearly)

खातेवाटप झाल्यानंतर दादा भुसे यांना संपर्क देखील होत नव्हता. त्यामुळे ते खरोखरीच नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. मात्र स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यासाठी ते धुळे येथे आले होते.

यावेळी कार्यक्रमात बोलताना दादा भुसे यांनी मंत्रीपद मिळाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘मला मिळालेल्या मंत्रीपदामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाराज नाही. उलट माझ्या मागणीनुसारच मला खाते देण्यात आले आहे.’

मागील सरकारमध्ये कृषीमंत्री असताना अवर्षणग्रस्त परिस्थितीत नुकसान भरपाईसाठी दौरे करावे लागत. पुर परिस्थितीमध्ये देखील ठिकठिकाणी राज्यभर फिरावे लागत होते. त्यामुळे होणारा प्रवास, दगदग पाहता यावेळी मी ते खाते नको, असे सांगितले होते. हा खुलासा देखील दादा भुसेंनी यावेळी केला.

शिंदे सरकारमध्ये दादा भुसे यांना बंधारे व खनिकर्म खात्याचे मंत्रीपद देण्यात आले आहे. ‘मला मिळालेल्या मंत्रीपदावर मी समाधानी आहे,’ अशा प्रकारचे विधान दादा भुसे यांनी केले.

पुढे बोलताना दादा भुसे यांनी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाताचा संदर्भ घेत सुचित विधान केले आहे. ते म्हणाले, सरकार नियम बनवत असते. मात्र ते नियम आपण सुद्धा पाळणे गरजेचे आहे. वाहतुकीचे किती नियम आपल्याकडून पाळले जातात? या गोष्टीचे आत्मचिंतन व्हायला हवे.

महत्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण झाले, तरीही राजन विचारे मध्यरात्री शिवसैनिकांसह होते उपस्थित
मोदी-शहांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलंच नव्हतं, एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा
खातेवाटपानंतर शिंदे गटातील ‘हे’ पाच मंत्री नाराज; एक मंत्री नॉट रिचेबल तर…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now