Share

PHOTOS: किल्ल्यावर फिरायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू, दुसऱ्याला अप्पर पोलिसांनी ‘असं’ वाचवलं

सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण या पावसाचा घरी बसू मनसोक्त आनंद घेत आहे, तर अनेकजण या पावसात फिरायला सुद्धा जात आहे. काही लोक हे गडकिल्ले, धबधबे फिरायला जात आहे. (uppar police save boy who sleep on fort)

अशा वातावरणात ट्रेकिंगला जाण्याची हौस अनेक तरुणांना असते. पण अशावेळी काही काळजी घेण्याचीही खुप गरज असते. कोणतीही चुक जीवावरही बेतू शकते. अशीच एक घटना नाशिकमधून समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील बालगण तालुक्यातील शिवकालीन साल्हेर किल्ल्यावर चढताना एकाचा मृत्यू झाला आहे.

साल्हेर किल्ल्यावर मालेगाव येथील १२ तरुण फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी ट्रेकिंग करताना १२ मित्रांमधील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. भावेश अहिरे असे त्या तरुणाचे नाव आहे. पाय घसरल्यामुळे तो थेट दरीत कोसळला होता. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी भावेशसोबत त्याचा मित्र मनीष मुठेकर हा देखील पडला होता, पण तो जखमी झाला होता. यातील काही तरुणांनी घटनेची माहिती मालेगाव येथे दिली. त्यानंतर घटनास्थळी मुल्हेर आणि जायखेडा पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्याला वाचवले आहे.

मालेगाव येथील अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी हेदेखील या मुलांना वाचवण्यासाठी मालेगाववरुन साल्हेर किल्ल्याजवळ आले होते. त्यांनीही किल्ल्यावर चढाई करुन जखमीला आपल्या पाठीवर घेत त्याला बाहेर काढले आहे.

अशात मृत्यू झालेल्या भावेशचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी जायखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अप्पर पोलिसांनी ज्यापद्धतीने जखमी तरुणांची मदत केली आहे. त्यामुळे अप्पर पोलिसांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
३६३ कोटींची हेरॉईन आणून ‘अशी’ लपवली होती कंटेनरमध्ये, लढवलेली शक्कल पाहून पोलिसही चक्रावले
बंडखोर, गद्दार म्हणून हिणवणाऱ्यांचं ऐकून घेऊ नका, त्यांचं कानशील लाल करा; संतोष बांगर भडकले
विनायक मेटेंनी फडणवीसांची तुलना केली श्री रामांशी; म्हणाले, तुम्ही श्रीरामांसारखे विकासाचे…

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now