Upendra dwivedi on pok | काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरवर मोठे वक्तव्य केले होते. पीओके पुन्हा ताब्यात घेण्यात येईल, असे त्यांनी म्हटले होते. आता संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारच्या जे काही निर्देश असतील, त्याचे पालन केले जाईल.आम्ही कोणतीही कारवाई करण्यास तयार आहोत, सरकारच्या सूचनेनुसार काम केले जाईल, असे उपेंद्र द्विवेदी यांचे म्हणणे आहे. उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला असल्याचे म्हटले जात आहे.
युद्धबंदीचे उल्लंघन झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. सीमेवर शांतता राखणे ही दोन्ही देशांची जबाबदारी आहे, मात्र पाकिस्तानने कोणतेही पाऊल उचलले तर त्याचे परिणाम भोगण्यास तयार राहावे लागेल, असेही उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी राजनाथ सिंह जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) त्यांनी जे काही केले आहे त्याची किंमत चुकवावी लागेल.पाकिस्तान आपल्या व्याप्त काश्मीरमधील लोकांवर ‘अत्याचार’ करत असून त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असे ते म्हणाले होते.
आता संरक्षणमंत्र्यांच्या याच वक्तव्यावर उपेंद्र द्विवेदी यांनी हे वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी चिनार पोलिसांनीही याबाबत मोठे वक्तव्य केले होते. शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे, तातडीने कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते.
तसेच लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनीही जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या टार्गेट किलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवाद्यांना काय करावे हे सुचत नाहीये. त्यामुळे ते निशस्त्र लोकांवर गोळीबार करत आहे. पण हे सहन केले जाणार नाही. पण त्यांचा हेतू आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
प्रेमासाठी तोडल्या धर्माच्या भिंती, हिंदू धर्म स्वीकारत मुस्लीम तरुणीने हिंदू तरुणासोबत घेतले सात फेरे
suryakumar yadav : सूर्यामुळे ‘या’ तीन दिग्गज फलंदाजांचे करिअर झाले उद्धवस्त, संघातून झाली कायमची हकालपट्टी
politics: खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? गंभीर आरोप करणाऱ्या महाजनांवर नाथाभाऊंचा जोरदार पलटवार