Share

रात्री सप्तपदी घेतली आणि सकाळी लग्नच मोडले; नववधूने सांगितलेलं कारण ऐकून बसेल जबर धक्का

crime
कोरोना विषाणूमुळे 2 वर्ष कोणतेच सार्वजनिक कार्यक्रम करता आले नाही. मात्र आता सर्व नियम राज्य सरकारने शिथिल केले आहे. यामुळे आता जनजीवन सुरुळीत सुरू झाले आहे. याचबरोबर सध्या सगळीकडे लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. लग्न म्हटलं की धमाल, मजामस्ती आलीच.

मात्र या लग्नसराईत अनेक अजब घटना घडत असल्याच पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणत लग्नाचे व्हिडिओ, फोटो व्हायरल होतं आहेत. यामुळे लग्नाचे भन्नाट किस्से देखील वाचायला मिळत आहे. अशीच एक विचित्र घटना समोर आल्याच पाहायला मिळत आहे.

वाचा नेमकं घडलं काय..? ही धक्कादायक उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील चौबेपूर येथे घडल्याची माहिती मिळाली आहे. साता जन्माची साथ एका रात्रीत सुटली आहे. नवरीने लग्नानंतर काहीच वेळात नवरदेवासोबतचं नातं तोडलं आहे. सध्या या विवाहाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

त्याचं झालं असं.. कादीपूर खुर्द गावात राहणारी राजा बाबू चौहान यांची मुलगी काजल हिचं लग्न साकेत नगर संकटमोचन वाराणसी येथील संजय चौहान नावाच्या व्यक्तीसोबत ठरलं होतं. 5 जून रोजी मोठ्या आनंदात गावात लग्नाचे सगळे विधी पार पडले. मात्र पुढे जे घडलं ते वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

दरम्यान, प्रथा आणि परंपरेनुसार लग्न पार पडलं. मात्र सोमवारी जेव्हा पाठवणीची तयारी सुरू झाली तेव्हा नवरीने नवरदेवासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. नवरदेवाचं वय खूप जास्त आहे असं तिने सांगितले. त्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली.

काही काळानंतर नवरी आणि नवरदेव दोन्हीकडच्या लोकांमध्ये बराच वेळ सखोल चर्चा झाली. मात्र नवरी आपल्या मतावर ठाम राहिली आणि अखेर हे लग्न मोडलं. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं होतं. पोलिसांनी दोन्ही कुटुंबियातील लोकांना आपसात बोलून काहीतरी मार्ग काढण्याचा सल्ला दिला.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now