Share

मरता मरता आजोबांनी बदललं नातवाचं नशीब, भीक मागून जगणाऱ्याच्या नावावर होती २ कोटींची संपत्ती

up

up shahjeb alam story | कधी कोणाचं नशीब पलटेल हे सांगता येत नाही. अशा अनेक घटनाही समोर येतात की काही लोक एका दिवसांत करोडपती होतात. आता असाच एक प्रकार समोर आला आहे. दररोज एक-एक रुपयासाठी हात जोडणारा लहान मुलगा एका रात्रीत करोडपती झाला आहे.

संबंधित घटना ही उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. एक मुलगा रोज भीक मागून दिवस काढत होता. पण तो एक करोडपती कुटुंबाचा सदस्य असल्याचे समोर आले आले. तो एक वर्षापूर्वी त्याच्या कुटुंबापासून दूरावला गेला होता. पण आता तो पुन्हा त्याच्या कुटुंबाला भेटला आहे.

शाहजेब आलम असे त्या मुलाचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील पंडौली गावचा मुळ रहिवासी आहे. त्याच्या वडीलांचे नाव मोहम्मद नावेद असे होते. २०१९ मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याची आई मुलाला आपल्या माहेरी घेऊन गेली.

पिरान कलियार येथे ते राहत होते. जगण्यासाठी तिथे ते छोटे मोठे काम करु लागली. पण २०२१ मध्ये कोरोनामुळे तिचे निधन झाले. त्यानंतर तो अनाथ झाला होता. त्यामुळे तिथे शेजारी असलेल्या दर्ग्याजवळ तो भीक मागून जगू लागला. अशात त्यानंतर जे घडलं ते खरंच हैराण करणारं होतं. त्याचे आजोबा मोहम्मद याकुबमुळे त्याचं संपुर्ण आयुष्यच बदललं.

मोहम्मद याकूब यांनी मृत्यूपत्रात आपल्या मालमत्तेचा हिस्सा मुलगा नावेदच्या नावावर केला होता. त्याची किंमत जवळपास दोन कोटी रुपये इतकी होती. याकूब यांच्या मृत्यूनंतर या सर्व गोष्टी समोर आल्या. त्यामुळे शाहजेबच्या नावावर ५ एकर जमीन आणि दोन एकर घर असल्याचे समोर आले आहे.

आपल्या नावावर इतकी संपत्ती आहे हे शाहजेबला माहितच नव्हते. त्यानंतर शाहजेबच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. त्याला खुप शोधलं पण तो भेटत नव्हता. त्यावेळी काही लोकांकडून त्यांना कळलं की तो भीक मागून जगतोय. त्यावेळी ते त्याला भेटले आणि पुन्हा त्याला आपल्या कुटुंबात सामील करुन घेतले.

महत्वाच्या बातम्या-
vijay malokar : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेच्या संस्थापक शिवसैनिकाने शिवसेनेला ठोकला रामराम
cyrus mistry : ‘या’ व्यक्तीमुळे झाला सायरस मिस्रींचा अपघात; अखेर खरे नाव आले समोर, गुन्हा दाखल
mukesh khanna : आज अर्ध्या कपड्यांवर नाचताय, उद्या कपडे न घालताच…; दीपिकाच्या बिकीनीवर शक्तीमान भडकला

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now