उत्तर प्रदेशमध्ये १४ मार्चला वकिलांकडून लाच घेण्यासाठी दिल्ली पोलीस अधिकारी आणि हवालदारासह चार लोक गेले होते. त्यांना यूपी पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे. तपासामध्ये पकडलेल्या महिला हवालदार आणि चालकाला सूचना देऊन सोडून देण्यात आले आहे.(UP police arrest bribe-taking Delhi police officer;)
मात्र हवालदार आणि अधिकाऱ्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकिलाकडून वसूल केलेले १.६० लाख रुपयेही आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बरेलीच्या ठाणे शाही भागातील आनंदपूर गावात राहणारा एक राजू नावाचा तरुण आहे.
त्याचे दिल्लीतील कालकाजी पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुलगी राजूसोबत पळून गेली होती. मुलीच्या कुटुंबीयांनी कालकाजी पोलिस ठाण्यात राजूविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास कालकाजी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पवन राणा करीत होते.
दरम्यान, राजूने बदाऊन येथील कॉलनी हाऊसिंग डेव्हलपमेंटमधील रहिवासी वकील नेकपाल सिंग यांच्याकडून लग्नाची कागदपत्रे तयार केली होती. रविवारी सकाळी दिल्ली पोलिस हवालदार पवन राणा, कॉन्स्टेबल कुलदीप यादव, महिला कॉन्स्टेबल आणि कार चालकासह राजूच्या बरेली येथील घरावर छापा टाकला.
राजूला ताब्यात घेतले.
राजूने लग्नाची कागदपत्रे दाखवताच पवन राणा वकील नेकपाल यांच्या घरी पोहोचला. जिथे त्याने वकिलावर आरोप केला की, त्याने लग्नाची कागदपत्रे बनावट बनवली आहेत. ज्यामुळे त्या वकीलाला तुरुंगात जावे लागेल. त्यानंतर पवन राणा सांगितले की, जर तुम्हाला जगायचे असेल तर १५ लाख रुपये द्यावे लागतील. बऱ्याच दिवसांनी १२ लाखात सौदा झाला. करारानुसार, दोन लाख रुपये सोमवारी १४ मार्चला द्यायचे आणि उर्वरित १० लाख रुपये दुसऱ्या दिवशी १५ मार्चला द्यायचे होते.
सोमवारी सकाळी अधिवक्ता नेकपाल यांनी जिल्हा बार असोसिएशनचे सचिव संदीप मिश्रा यांना हा संपूर्ण प्रकार सांगितला. तेव्हा सचिव त्यांना एसएसपी डॉ. ओ.पी. सिंह यांच्याकडे घेऊन गेले. येथे एसएसपीने संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर एसडीएम सदर आणि सीओ सिटी आलोक मिश्रा यांना सापळा रचण्याच्या सूचना दिल्या.
वकिलाने पाचशेच्या नोटा जोडून एकूण १.६० लाख रुपये उभे केले. या सर्व नोटांचे क्रमांकही पोलिस पथकाने स्वतंत्रपणे लिहिले होते. सोमवारी दुपारी पवन राणा आणि कॉन्स्टेबल कुलदीप यादव हे कारने वकिलाकडे पोहचले. त्यांनी त्यांच्याकडे रक्कम मागितली. उसावन रोडवरील सिंगलर मिशन स्कूलजवळील वकिलाकडून दोघांनीही पैसे घेतले आणि ते तेथून निघून गेले.
उर्वरित १०.४० लाख रुपये कोणत्याही परिस्थितीत उद्या देण्यास सांगितले होते. लाच घेतल्यानंतर या दोघांनीही गाडी पळवली. मात्र काही अंतरावर एसडीएम आणि सीओ सिटी त्यांच्या पथकासह दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करत होते. दातागंज तिराहेजवळ घेराव घातल्यानंतर कार पकडण्यात आली.
त्यानंतर त्यातून रक्कम जप्त करण्यात आली आहे. अधिकाऱ्याकडून रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे. दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार, कलम ४६७, ४६८, ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
‘त्या’ नेत्यांना तिकीट देण्यास मीच नकार दिला; नरेंद्र मोदींचा मोठा खुलासा
१० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेले ‘हे’ पेनी शेअर्स देताय २३५० ते ३६४३२ टक्के परतावा; वाचा संपूर्ण लिस्ट