राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना अभिवादन केले. यातच एका कट्टर शिवसैनिकाची जोरदार चर्चा होतं आहे. कोल्हापुरातील एका शिवसैनिकानेही त्यांना आगळी वेगळी आदरांजली वाहिली आहे. तसंच या शिवसैनिकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचं आवाहनही केलं आहे.
पुढे माध्यमांशी बोलताना यादव यांनी म्हंटलं आहे की, आताचे मुख्यमंत्री हे कृतशील मुख्यमंत्री आहेत. कार्यकर्त्यापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले आहेत. याचाही आनंद आणि अभिमान आहे, असं विजय यादव म्हणाले. सध्या एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे.
याबद्दल बोलताना यादव यांनी म्हंटलं आहे की, सध्या टीकेचे राजकारण सुरू आहे. या गोष्टी थांबल्या पाहिजे. ज्या दिवशी या गोष्टी थांबतील त्यादिवशी अंबाबाईसमोर नतमस्तक होईल. त्यानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेऊन त्यांचे पाय पडेन. आणि तिथून ठाण्यात दिघे साहेबांच्या टेंभी नाक्यापर्यंत दंडवत घालत जाईन.’
दरम्यान, आनंद दिघे यांचा २००१ च्या ऑगस्टमध्ये मोठा अपघात झाला होता. त्यानंतर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना २६ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांचे निधन झाले. तो दिवस ठाणेकरांसाठी मोठा दुःखद होता. आजही आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा देताना शिवसेनेचे अनेक जुने कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या डोळ्यात पाणी तरळते.
१५ दिवसांनी शुद्धीवर येताच राजू श्रीवास्तवांनी पत्नीला पाहून उच्चारले ‘ते’ चार शब्द; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येई
थेट पंजाब आणि हिमाचलमधून उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; BMC निवडणुकीत उचलणार मोठी जबाबदारी
AAP: दिल्लीतही ऑपरेशन लोटस, आपचे ४० आमदार नाॅट रिचेबल; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भर विधानसभेत जाहीर सवाल, म्हणाले, ‘आम्ही गद्दार असतो तर…






