एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. अशी स्थिती असताना आता धर्मवीर चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारलेला अभिनेता क्षितीश दाते याच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्याने स्टोरी पोस्ट करत आपला राग व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतल्यानं शिवसेनेसमोर अभूतपूर्व संकट निर्माण झालं आहे. आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे.
अशी स्थिती असताना धर्मवीर चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारलेला अभिनेता क्षितीश दाते याने इंस्टा स्टोरी टाकली आहे. त्याची स्टोरी सध्या चर्चेत आली आहे. क्षितीजने एका वृत्तपत्राच्या कात्रणाचा फोटो शेअर करून लिहिले की, मोठी राजकीय उलाढाल सुरू असताना चेष्टेत मीम्स येणं वेगळं आणि वर्तमानपत्रात छापणं वेगळं. हे असं छापणं चुकीचं आहे.
सध्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी जाहिर केली आहे. त्याचा संबंध धर्मवीरशी लावून सोशल मीडियावर काही मीम्स व्हायरल झाले आहे. ‘त्यात थोडे दिवस मलाच एकनाथ समजून बैठकीत घ्या असंही मिम्स आहे.’ क्षितिजनं हा फोटो आपल्या इंस्टा स्टोरीत टाकला आहे.
एका वृत्तपत्रानं तो छापला आहे असे क्षितिजनं म्हटलं आहे. तो वृत्तपत्राच्या कात्रणाचा फोटो आपल्या इंस्टाच्या स्टेट्सला ठेवून क्षितिजनं नाराजी व्यक्त केली आहे. क्षितीज हा मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता असून अनेक नाटक, वेब सीरिज आणि सिनेमांमधून त्याने आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे.
नुकत्याच आलेल्या सरसेनापती हंबीरराव सिनेमातही त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. मात्र ‘धर्मवीर’ सिनेमामुळे तो विशेष प्रकाशझोतात आला. हुबेहूब एकनाथ शिंदे साकारल्यामुळे त्याचे अनेक पातळीवर कौतुकही झाले. दरम्यान, अभिनेता आरोह वेलणकर यानं देखील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपले मत व्यक्त केलं होतं.