पुण्यातील धनकवडी परिसरात तरुणीला पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली समजून दोन तरुणांनी तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तरुणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोहेल आणि आरबाज नामक तरुणांनी पिडीत तरुणीची श्रीवल्ली समजून छेड काढली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी धनकवडी येथील रहिवासी असून सोमवारी रात्री ती आपल्या घराजवळ थांबली होती. यावेळेसच आरोपी सोहेलने तिला बघून शिट्टी वाजवण्यास सुरुवात केली. तसेच तु पुष्पा चित्रपटातील श्रीवल्लीसारखी दिसतेस. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. असे आरोपीने तरुणीला म्हटले.
यावेळी सोहेलसोबत आरोपी अरबाज होता. त्यानेही तरुणीला छेडण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी तरुणीने आरडाओरड केल्यामुळे तरुणीचा भाऊ तिथे आला. त्याने सोहेल आणि अरबाजला बेदम चोप दिला. यानंतर दोघे ही तेथून फरार झाले. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या घटनेविषयी तरुणीने तक्रार नोंदवली.
आता याप्रकरणी पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवून घेतला आहे. तसेच फरार आरोपींचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. परंतु अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न गंभार बनला असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाट होताना दिसत आहे. यावर पोलिसांनी किती कठोर कारवाई केली तरी अशा घटनांना आळा बसताना दिसत नाहीये.
सध्या तर पुष्पा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यातील सीन पाहून तसेच कृत्य करण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. मध्यंतरी पुष्पा चित्रपटात दाखवल्याप्रमाणे चोरी केल्याची घटना महाराष्ट्रात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी संपूर्ण एका टोळीलाच अटक केले होते. त्यानंतर आता तरुणीला श्रीवल्ली समजून तिची छेड काढण्यात आल्याची घटना घडली आहे.
महत्वाच्या बातम्या
RRR साठी आलिया भट्ट नव्हती पहिली पसंती, ‘या’ अभिनेत्रीला पहिल्यांदा आली होती चित्रपटाची ऑफर
निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि.., गडकरींनी व्यक्त केली इच्छा
कृषी पर्यटनाची गरज शेतकऱ्यांना व पर्यटकांना – गणेश चप्पलवार
१ लाखाच्या हुंड्यासाठी घरातून बाहेर काढलं, सुनेनं स्वत:च्या हिंमतीवर उभा केला ६० लाखांचा व्यवसाय