प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक बोनी कपूर हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. ट्रोल होण्याचे कारण म्हणजे एका अभिनेत्रीसोबतचे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. ते फोटो पाहून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. अभिनेत्री तुमच्या मुलीच्या वयाची आहे तुम्हाला पटते का अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी फोटो पाहून दिली आहे.
दिग्दर्शक बोनी कपूर यांचे याआधी देखील अनेक अभिनेत्रीसोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, सध्याच्या फोटोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बोनी कपूर यांच्यावर नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे. हे फोटो आयफा 2022 पुरस्कार सोहळ्यातील आहे.
हा सोहळा आयलंडमध्ये सुरु आहे. त्याठिकाणी बॉलीवूडमधले वेगवेगळे सेलिब्रेटी सहभागी झाले आहेत. याच दरम्यान, बोनी कपूर यांनी अभिनेत्री आरती खेत्रपालसोबत फोटो काढले आहेत. त्यात त्यांनी तिच्या कमरेभोवती हात टाकून फोटोसाठी पोज दिली आहे. तो फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी बोनी कपूर यांचा क्लास घेतला आहे.
तुम्ही ज्या अभिनेत्री सोबत फोटो घेतला आहे ती तुमच्या मुलीच्या वयाची आहे अशा पद्धतीनं त्यांना नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात आले आहे. यामध्ये व्हाईट कलरचा कुर्ता बोनी कपूर यांनी परिधान केला आहे. ओटीटी अँक्ट्रेस आणि होस्ट म्हणून ओळख असलेली आरती ही आयफामध्ये पहिल्यांदाच सहभागी झाली आहे. यामध्ये आरती थाई हाय वन पीस ड्रेसमध्ये दिसत आहे.
दरम्यान, आरतीनं अनेक सेलिब्रेटींसोबतचे फोटो शेयर केले असून तिचा बोनी कपूर यांच्यासोबतच्या फोटोला नेटकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. एकानं त्यावर कमेंट केली आहे की, आरतीनं जी वेशभुषा केली आहे ती काही समजत नाही.
तसेच काहींनी म्हटले की, सध्या बॉलिवूड सेलिब्रिटी कशाप्रकारचे ड्रेस परिधान करतात, कशा प्रकारची वेशभूषा करतात हे काही कळायला मार्ग नाही. तर एकाने बोनी कपूर यांना म्हटलं की, काका तुम्ही ज्या मुलीच्या कंबरेवर हात ठेवून फोटो काढला ती तुमच्या मुलीच्या वयाची आहे.