Share

अभिनय आणि आईची जबाबदारी सांभाळता येईना, अनु्ष्का शर्माने घेतला मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत म्हणाली..

अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच सोशल मीडियावर केलेल्या तिच्या पोस्टमुळे चर्चेत येत असते. विराट कोहलीने कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर तिच्या भावनिक पोस्ट प्रचंड व्हायरल झाल्या होत्या. आता ती चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, तिनं तिच्या भावावर सोपवलेली एक मोठी जबाबदारी आणि त्यासंदर्भात केलेली पोस्ट होय.

‘झिरो’ या चित्रपटानंतर अनुष्काने चित्रपटांमधून काही काळ ब्रेक घेतला. जानेवारी 2021 मध्ये तिने मुलीला जन्म दिला. आई झाल्यानंतर अनुष्काने पुन्हा एकदा तिच्या कामाला सुरुवात केली आणि आता ‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एकीकडे आईची जबाबदारी आणि दुसरीकडे अभिनय अशा दोन्ही गोष्टी सांभाळत अनुष्काने आजपर्यंत तिच्या ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ निर्मिती संस्थेसाठी काम केलं. ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ नावाची निर्मिती कंपनी ऑक्टोबर 2013 मध्ये  तिचा भाऊ कर्नेश शर्मासोबत मिळून सुरू केली होती.

मात्र आता आपल्या अभिनयावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिने मोठा निर्णय घेतला आहे. अनुष्काने ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ या निर्मिती कंपनीमधून काढता पाय घेतला आहे आणि त्याची सर्व जबाबदारी तिने तिच्या भावावर सोपवली आहे. याविषयीची माहिती तिनं सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली आहे.

‘क्लीन स्लेट फिल्म्स’ या बॅनरअंतर्गत अनुष्काने, ‘फिलौरी’, ‘परी’, ‘NH 10’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. तसेच ‘पाताल लोक’ या प्रसिद्ध वेब सिरीजची निर्मिती देखील, या कंपनी मार्फत केली होती. मात्र, आता याच कंपनीमधून ती काढता पाय घेत आहे. या संदर्भात तिनं पोस्ट केली आहे.

पोस्टमध्ये तिनं लिहिले आहे की, ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ ही निर्मिती कंपनी भावासोबत सुरू केली होती. आम्हा दोघांनाही या क्षेत्राचा फारसा अनुभव नव्हता. मात्र काहीतरी वेगळं करण्याच्या जिद्दीमुळे आम्ही हे केलं. आता मिळवलेल्या यशाबद्दल मला अभिमान वाटतो. ही कंपनी आता ज्या ठिकाणी उभी आहे, तिथपर्यंत आणण्यासाठी माझा भाऊ कर्नेशचा त्यात मोठा वाटा आहे.

तसेच लिहिले, आई झाल्यानंतरही मी अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे आणि या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखण्यासाठी मला तारेवरची कसरत करावी लागतेय. त्यामुळे माझ्याकडे जो काही वेळ आहे, तो मी माझ्या अभिनयासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच मी क्लीन स्लेट फिल्म्समधून काढता पाय घेत आहे. कर्नेश त्याची जबाबदारी व्यवस्थित पूर्ण करेल, असा माझा ठाम विश्वास आहे ,असे म्हणत शुभेच्छा देते.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now