Share

उमरान मलिकने पदार्पणाच्या सामन्यातच सुरू केला कहर, पहील्याच चेंडूचा वेग पाहून सगळे हादरले

India vs New Zealand: उमरान मलिकने पहिल्याच वनडे सामन्यात आपल्या वेगानं कहर केला. असा वेगवान चेंडू टाकला की पाहून सगळेच हादरले. भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता, मात्र या सामन्यात उमरान मलिकने आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली.

umran malik: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात उमरान मलिकने भारताकडून पदार्पण केले. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. टीम इंडियाला हा सामना जिंकता आला नसला तरी उमरानने शानदार कामगिरी केली. त्याबद्दल जाणून घेऊया.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेमध्ये कर्णधार शिखर धवनने उमरान मलिकला संधी दिली. हा त्याचा पहिलाच सामना होता. त्याने आपल्या खेळाने कोणालाही निराश केले नाही आणि 10 षटकात 66 धावा देत 2 बळी घेतले.

त्याची गोलंदाजी पाहून विरोधी फलंदाजांनी तोंडात बोटे घातली. वेग ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. उमरान मलिकने त्याच्या पहिल्याच षटकात कारकिर्दीतील पहिला चेंडू 145.9kph च्या वेगाने टाकला, तर उमरानने दुसरा चेंडू 1473.3kph वेगाने टाकला.

त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिल्या षटकातील तिसरा चेंडू 145.6kph च्या वेगाने टाकत चमत्कार घडवला. शेवटचा चेंडू 149.6kph च्या वेगाने फेकून उमरानने दाखवून दिले आहे की तो वेगाचा नवा बादशहा बनणार आहे. त्याने मॅचमध्ये डॅरिल मिशेल आणि डेव्हॉन कॉनवे यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. टीम इंडियाने शिखर धवन, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंड संघाला 307 धावांचे लक्ष्य दिले, जे किवी संघाने 3 गडी गमावून सहज गाठले. यासह न्यूझीलंड संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

मरान मलिकने १६व्या षटकात डेव्हॉन कॉनवेला पायचीत केले. यावेळी किवी संघाने 68 धावांवर 2 विकेट गमावल्या होत्या. 20 षटकांत उमरानने डॅरिल मिशेलला बाद करत सामन्यावर भारताची पकड पूर्णपणे मजबूत केली. ODI मध्ये डेब्यू विकेट घेतल्यानंतर उमरान मलिकने गिल-सूर्याला मिठी मारून खास पद्धतीने आनंद साजरा केला.

भारताकडून या सामन्यात उमरान मलिकने सर्वाधिक विकेट घेतल्या, याशिवाय कोणताही गोलंदाज प्रभावी ठरू शकला नाही. त्यामुळे पहील्या विजयाची नोंद करून यजमानांनी 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now