shivsena : राज्यातील सत्तासंघर्ष थेट सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. शिवसेना कोणाची? यावरून सध्या ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. 40 आमदारांना सोबत घेऊन शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन केले.
त्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले. यातूनच खरी शिवसेना कोणाची? हा प्रश्न निर्माण झाला. हाच वाद आता सुप्रीम कोर्टात पोहचला असून अद्याप यावर कोर्टाने कोणताही निर्णय दिलेला नाहीये. 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान पुढील सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार असल्याच सांगण्यात आल.
सुप्रीम कोर्टाने पुढील तारीख देताच त्यावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या. राजकीय वर्तुळातून देखील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी एक मोठं वक्तव्य करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.
याबाबत माध्यमाशी बोलताना बापट यांनी सांगितलं आहे की, सुनावणीअंती शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरले तर त्यांना मंत्रिपदी राहता येणार नाही. या १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्रीच अपात्र ठरले तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
पुढे बोलताना बापट यांनी म्हंटलं आहे की, शिंदे – फडणवीस सरकार कोसळले तर ज्याच्याकडे बहुमत आहे, असा नवा मुख्यमंत्री शोधावा लागेल. सध्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे बलाबल पाहता, कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची दाट शक्यता असल्याच देखील त्यांनी म्हंटलं आहे.
एवढंच नाही तर त्यानंतर आगामी सहा महिन्यांत महाराष्ट्रात पुन्हा एकदा विधानसभेची मध्यावधी निवडणूक होईल, असे देखील बापट यांनी म्हंटलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आता सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दिराच्या प्रेमात वेडी झाली वहिणी, रात्री नवऱ्याला समोसा खाऊ घातला अन् त्यानंतर…
Maruti suzuki : मारूतीच्या ‘या’ CNG कारचा बाजारात धुमाकूळ; एकाच महीन्यात विकल्या दिड लाखांहून अधिक गाड्या
bachchu Kadu : दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही बच्चू कडूंनी रवी राणांना दिला इशारा; म्हणाले, यापुढे वाट्याला गेला तर…