भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन(Ukren) देश सोडताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या विद्यार्थ्यांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. काही भारतीय विद्यार्थी युक्रेन सोडून पोलंडकडे(Poland) निघाले होते. त्यावेळी युक्रेनच्या सैनिकांनी भारतीय विद्यार्थ्यांवर(Student) लाठीचार्ज केला. तसेच सैनिकांनी विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा देखील वापर केला, अशी माहिती समोर आली आहे.(ukren soldiers attack on indian student)
युक्रेनच्या लष्कराने केलेल्या हल्ल्यात काही भारतीय विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील एका विद्यार्थ्यांने आपली व्यथा मांडली आहे. या विद्यार्थ्याने सांगितले की, आम्ही १०० ते १५० किमी अंतर पार करून युक्रेनच्या सीमेपर्यंत आलो. मात्र, युक्रेनच्या बाजूने आम्हाला सीमा पार करूच दिली जात नव्हती”, अशी माहिती त्या विद्यार्थ्याने दिली.
“युक्रेनमधून निघताना आमच्याजवळ अनेक बॅगा होत्या. परंतु कडाक्याची थंडी आणि पुरेशा अन्नाच्या अभावामुळे आम्ही आवश्यक तेवढेच सामान जवळ ठेवले आणि बाकीचे सामान वाटेत फेकून दिले”, असे त्या विद्यार्थ्याने सांगितले. रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत.
शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेले परदेशी विद्यार्थी आपला जीव वाचविण्यासाठी धावाधाव करत आहेत. युक्रेनमधील अनेक परदेशी विद्यार्थी पायपीट करत पोलंडच्या दिशेने जात आहेत. यातील एका विद्यार्थ्याने आपला अनुभव सांगितला आहे. युक्रेन ते पोलंड हा प्रवास कसा केला? याबद्दलची माहिती त्या विद्यार्थ्याने सांगितली आहे.
“आम्ही १०० ते १५० किमी अंतर पायी कापत आलो. त्यापुढील काही अंतर आम्ही टॅक्सी आणि खाजगी गाडी पकडून पार केले. युद्धामुळे रेल्वे काही मिनिटांतच फुल झाल्या होत्या. त्यामुळे आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. रशिया युक्रेनवर हल्ला करणारच नाही, असाच सर्वांना विश्वास होता. त्यामुळे आमच्यातील अनेकजण गाफील राहिले”, असे त्या विद्यार्थ्याने सांगितले.
युक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिक आणि विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहे. भारत सरकारने देखील युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना देशात परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ ही मोहीम राबविली आहे. ‘ऑपरेशन गंगा’ मार्फत आतापर्यंत सुमारे ८००० विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना युक्रेनमधून भारतात आणण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
विधिमंडळात खाली डोकं वर पाय करणारे आमदार संजय दौंड कोण आहेत? शरद पवारांच्या एका शब्दावर झालते विजयी
‘मी लोकांना सांगू शकत नाही की कोणत्या परिस्थितीतून जातोय’, विराटचे खळबळजनक वक्तव्य
मोठी बातमी! ‘या’ दोन शहरांत मांस आणि मद्यपानावर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय