रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे तेथील नागरिकही आपल्या देशाला वाचविण्यासाठी रस्तावर उतरले आहे. या नागरिकांनी युक्रेन देशाच्या संरक्षणासाठी एक वेगळीच युक्ती लढवली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आपण या दोन्ही देशांमध्ये फक्त दारूगोळा आणि शस्त्रांचे हल्ले होताना पाहत आहोत.
परंतु आता युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी रशियाच्या ड्रोनवर टोमॅटो हल्ला केला आहे. कीव्हमध्ये राहणाऱ्या एलेनाने रशियाच्या ड्रोनला टोमॅटो फेकून मारले आहेत. इतकेच नव्हे तर, तीचे बघून इतर नागरिकांनी ही घरातील सामानांचा वापर करत रशियाच्या सैन्यांवर हल्ला केला आहे.
आता शस्त्रे न वापरता नागरिक घरातील सामान रशियन सैनिकांना फेकून मारत आहेत. एलेनाने उचलेल्या पावलामुळे नागरिकांच्या मनातील भिती कमी झाली आहे. किव्हमधील लहान मुले देखील रशियन सैन्यांना तोंड देताना दिसत आहेत.
नागरिकांचा टोमॅटो हल्ला पाहून रशियन सैनिक त्या भागातून पळून जात आहेत. याचाच आनंद नागरिकांना ही वाटत आहे. रशियाच्या विरोधात इतर देशांनी ही आवाज उठविला आहे.
ब्रिटनने रशियाच्या नागरिकांची प्रवेशबंदी नाकारली आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेन देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी युक्रेनमध्ये अडकलेले 600 भारतीय विद्यार्थी मायदेशी येणार आहेत. भारताने आतापर्यंत 6000 नागरिकांना मायदेशी परत आणले आहे.
दरम्यान युक्रेनवर हल्ला करत रशिया युक्रेनची राजधानी किव्ह ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु रशियाच्या हाती काही यश लागेनासे झाले आहे. रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनमधील नागरिकांना सुरक्षास्थळी हलवण्यात येत आहे.
या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तेथील नागरिक देश सोडून जाण्याच्या निर्णयावर ठाम झाले आहेत. युक्रेनमधून बाहेर पडलेल्या नागरिकांची संख्या 15 लाख 30 हजारांवर येऊन पोहचली आहे. अजून देखील लोक देश सोडून जात असल्याची माहिती राष्ट्रांच्या निर्वासितविषयक संस्थेने दिली आहे. जे नागरिक युक्रेनमध्ये थांबले आहेत ते सैन्यांशी दोन हात करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
अखेर प्रतीक्षा संपली! मारूतीची स्विफ्ट डिझायर आली सिएनजी व्हेरीयंटमध्ये; किंमत आहे फक्त…
काॅंग्रेसचा पराभव का झाला? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितली ‘कारणे’; पक्षाच्या चुकाही दाखवल्या
आमच्यापेक्षाही वाईट हाल तुमचे पंजाबात झालेत, तिथं विजय मिळवून दाखवा; शिवसेनेचे भाजपला आव्हान