महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोहचला आहे. विशेष बाब म्हणजे, शिवसेना (shivsena) आणि शिंदे गटाची न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. सत्तेतून असून देखील एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड हा शिवसेनेसाठी मोठा धक्का देणारा ठरला आहे.
राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना कुणाची? या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरीत आहे. शिवसेना कुणाची? याबाबत शिंदे गट आणि शिवसेनेने दाखल केलेल्या विविध याचिकांवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
याचबरोबर यापूर्वीच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याबाबत सुतोवाच केले होते. आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार होती. मात्र आता ती सुनावणी उद्या होईल का, याची शक्यता कमी आहे.
यावर आता खुद्द ज्येष्ठ वकिल उज्वल निकम (Ujwal Nikam) यांनी सविस्तर भाष्य केले आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना निकम यांनी म्हंटलं आहे की, आज सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात होईल असे वाटत नाही. कारण अद्यापपर्यंत घटनापीठ स्थापन झाले नाही.’
याचबरोबर पुढे बोलताना निकम म्हणाले आहेत की, ‘आज घटनापीठाची स्थापना होईल की नाही हे पहावं लागेल. त्यानंतर घटनापीठापुढे कोणते मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत. हे त्यांना स्पष्ट करावे लागेल. त्यानंतर युक्तिवाद सुरु होईल,’ असं वकिल उज्वल निकम यांनी स्पष्टच सांगितलं आहे.
दरम्यान, आज होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. कोर्टात उद्या व्हायचं ते होईल, मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. लोकांच्या भावना आपल्यासोबत आहेत. लोक निवडणूकीची वाट पाहात आहेत, असेही ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
गोविंदांना आरक्षण देण्याच्या निर्णयाला श्रीकांत शिंदेंचा विरोध; मुख्यमंत्र्यांना जाहीर इशारा देत म्हणाले…
इंदूरीकर महाराज पुन्हा अडचणीत; भडकलेल्या गावकऱ्यांचा थेट पोलिस ठाण्यात ठिय्या
‘वर्षातून एकदा दहीहंडी फोडण्याऱ्या गोविंदांना आरक्षण देण्यापेक्षा रोज साहसी खेळ करणाऱ्या डोंबाऱ्यांना आरक्षण द्या’
Mumbai : दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत मोठी दुर्घटना; चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; पहा व्हिडीओ