कायदेतज्ज्ञ उज्वल निकम हे नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्याने चर्चेत असतात. कायद्याविषयी निकम हे नेहमीच आपले मत मांडतात. मोठं – मोठ्या खटल्यांच्या निर्णयांवर देखील निकम हे आपले मत मांडताना पाहायला मिळाले आहेत. आता पुन्हा एकदा निकम यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
नुकताच सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. १० सप्टेंबर रोजी हा सत्कार समारंभ पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाने सरन्यायाधीशपदी नियुक्त झाल्याने न्या. लळित यांचा सत्कार केला. मात्र हा सत्कार समारंभ एका कारणावरून चांगलाच चर्चेत आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेत उभी फुट पडली आहे. शिवसेना कोणाची? यावरून सध्या वाद सुरू आहे. हाच वाद थेट कोर्टात देखील पोहचला आहे. मात्र असं असतानाच नुकताच पार पडलेला सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांचा सत्कार समारंभ वादात सापडला आहे.
त्याचं झालं असं की, मुंबई उच्च न्यायालयातून सत्कार आयोजकांनी या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले होते. मात्र विरोधकांनी यावर आक्षेप घेतला अन् नवीन वादाला तोंड फुटले. मुख्यमंत्री शिंदे हे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेसने देखील निशाणा साधला आहे.
दरम्यान, हा वाद चिघळत असतानाच आता याच वादात कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी उडी घेतली आहे. निकम यांनी याबाबत माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया देताना म्हंटलं आहे की, या प्रकरणावरुन उगाच गैरअर्थ काढू नये, असा सल्ला निकम यांनी यांनी दिला आहे.
पुढे बोलताना निकम म्हणाले, ‘शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आले होते. आत्तापर्यंतचा प्रघात आहे की भारतातील सर्व न्यायाधीशांचा ज्यावेळी सत्कार होत असतो त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून नेते उपस्थित राहतात. यामुळे त्यामधून अर्थ आणि गैरअर्थ काढणं योग्य नसल्याच मत निकम यांनी मांडलं.
महत्त्वाच्या बातम्या
प्रभादेवीतील वाद चिघळणार? शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांविरोधात पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, वाचा नेमकं काय घडलं?
Raj Thackeray : मनसे – शिंदे गट महापालिका निवडणूका एकत्र लढवणार?, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Garba : आता गरब्याच्या ठिकाणी बिगरहिंदूंना प्रवेश नाही; लव्ह जिहाद थांबवण्यासाठी मोठा निर्णय