सध्या सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्ता संघर्षावरुन वाद सुरु आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने तीन दिवसांसाठी पुढील तारीख जाहीर केली आहे.
आता राज्यात घडाळ्याचे काटे पुन्हा उलट्या दिशेने फिरणार का? अशी चर्चा होत आहे. यावर कायदेतज्ज्ञ उज्जवल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्यावर आणि बहुमत चाचणीवर भाष्य केलं आहे.
कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी घटनापीठासमोर अतिशय भावनास्पर्श असा युक्तिवाद केला आहे. असं झालं नाही तर लोकशाही संपेल, असे भावनेला स्पर्श करणारे मुद्दे त्यांनी युक्तिवाद करत असताना मांडले आहे. पण हे घटनापीठ आहे. त्यामुळे घटनांचा आणि संंविधानाचा संबंध कसा लावता येईल हे पाहिलं जाईल, असे निकम यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिक मुद्देही उपस्थित केले आहे. ३० जूनला बहुमत चाचणी होणार होती. पण त्यामध्ये ठाकरे गटाने सहभाग घेतला नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्या चाचणीत ठाकरे गटाने सहभाग घेतला असता तर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाला निश्चित करता आलं असतं. ठाकरे गट अल्पसंख्यांक झाला असता तरी नबाम रेबिया खटल्याप्रमाणे ती परिस्थिती हाताळता आली असती, असे न्यायालयाने म्हटले असल्याचे निकम यांनी म्हटले आहे.
न्यायाधीशांनी आतापर्यंत वेगवेगळी मते नोंदवली आहे. त्यामुळे न्यायालयाने काही अंतिम निकाल दिला आहे असे नाही. न्यायालयाने वकीलांच्या युक्तिवादांमध्ये आणखी स्पष्टता यावी यासाठी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. अजूनही ही सुनावणी पुर्ण झालेली नाही. कारण शिंदे गटाचं म्हणणंही न्यायालय ऐकून घेणार आहे, असे निकम यांनी म्हटले आहे.
तसेच न्यायालयाने कोणाकडून निकाल देईल हे सांगणे अजून कठीण आहे. सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले आहे की, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांचा आहे. पण ते अध्यक्ष कोणते याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार याकडे पाहावे लागणार आहे, असे निकम यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
संजय राऊतला मारण्यासाठी सुपारी घेतल्याचा आरोप असलेला राजा ठाकूर आहे तरी कोण? जाणून घ्या…
रुपयासमोर थरथर कापेल डॉलर, लवकरच जगाला दिसेल रूपयाची ताकद; दिग्गज अर्थतज्ञ असं का म्हणाला? वाचा..
‘या’ महीला क्रिकेटने 173 KPH च्या विक्रमी वेगाने टाकला चेंडू; अख्खे क्रिकेटजगत हादरले