निवडणूक आयोगाच्या निर्णयाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिले आहे. शिंदे यांना चिन्ह आणि नाव दिल्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच उद्धव ठाकरेंना हे चिन्ह आणि नाव परत मिळू शकते का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आता जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्जव निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना चिन्ह आणि नाव परत मिळू शकणार की नाही? यावर भाष्य केलं आहे. निवडणूक आयोगाचा निकाल कायम असतो. पण सुप्रिम कोर्टात त्यांनी दाद मागितली आणि तिथे न्याय मिळाला तर त्यांना चिन्ह आणि नाव परत मिळू शकते, असे निकम यांनी म्हटले आहे.
पक्षाबाबत निवडणूक आयोगाने जो निकाल दिला तो निकाल अंतिम असतो. पण अपवादात्मक प्रकरणात सुप्रीम कोर्ट हा विषय स्टँड होऊ शकतो. त्यांना दाद मागता येते, असे उज्जव निकम यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता ठाकरे गट पुढे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रिम कोर्टात गेल्यावर उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेवर कसा अधिकार आहे हे त्यांना पटवून द्यावे लागेल. तसेच जर १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात ठाकरे गटाच्या बाजूने निकाल लागला तर आयोगाच्या निर्णायवर विचार केला जाऊ शकतो, असेही निकम यांनी म्हटले आहे.
तसेच निवडणूक आयोगाचा निकाल जरी अंतिम असला तरी ठाकरे हे सुप्रिम कोर्टात दाद मागू शकतात. त्यामुळे सुप्रिम कोर्टाचा जो निकाल असेल तोच याचा अंतिम निकाल असेल. निवडणूक आयोगाचा निकाल आहे शिंदेंना आनंद देणारा आहे. पण तो किती वेळ टिकेल हे सांगता येत नाही, असेही निकम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एकनाथ शिदे यांना शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्यामुळे त्यांच्या गटात आनंदाचे वातावरण आहे. एकनाथ शिदेंनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, सत्याचा विजय झाला आहे. पण हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
निवडणूक आयोगात ऐनवेळी ठाकरेंचा घात करणाऱ्या ‘त्या’ दोन खासदारांची नावे आली समोर; वाचून धक्का बसेल
बाद नसतानाही विराटला बाद देणाऱ्या अंपायरची कारकिर्द २४ तासांतच संपली; वाचा नक्की काय घडलं
…म्हणून आयोगाने एकनाथ शिंदेंना दिलं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह; अखेर खरे कारण आले समोर