गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. यात नवाब मलिक, अनिल देशमुख यांचा समावेश आहे. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे.
अशातच मंगळवारी राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली. थेट ठाकरे कुटुंबालाच थेट ईडीने घेरले. मनी लॉन्डिरग प्रकरणात मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
या कारवाईनंतर पुन्हा एकदा राजकारण चांगलेच तापल आहे. केंद्रातील सरकार पदाचा दुरुपयोग करून त्रास देत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि केंद्रातील भाजपा सरकार यांच्यातील संघर्ष येणाऱ्या काळात अधिक वाढणार असल्याचे चित्र आहे.
तर याचाच धागा पकडत मनसेने शिवसेनेला डिवचलं आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दुनियादारी चित्रपटातील एक व्हिडिओ सीन शेअर केला आहे. 6 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, अभिनेता जितेंद्र जोशी, मेव्हणे, मेव्हणे, मेव्हण्यांचे पाव्हणे… असे म्हणताना दिसून येत आहे.
https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1506479899326181385?s=20&t=XkyFHe8chmcIXsWwv_KJfQ
दरम्यान, या ट्विटमध्ये देशपांडे यांनी कोणतही नाव टाकलेल नाहीये. मात्र मेव्हणे, मेव्हणे, मेव्हण्यांचे पाव्हणे..! यावरून असेच स्पष्ट होतं आहे की त्यांचा खिल्ली उडविण्याचा रोख शिवसेनेकडेच आहे. तसेच या व्हिडिओसोबतच पाहुणे आले घरापर्यंत.. असे कॅप्शनही संदीप देशपाडे यांनी दिले आहे.
या कारवाईनंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच भाजपा नेते किरीट सोमय्यांनी यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ठाकरे यांना सूचक इशारा देत ते म्हणाले, ‘आगामी काही दिवसांत आणखी सहा छोटे मोठे घोटाळे बाहेर येणार असून तपास यंत्रणांची कारवाई होणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. तसेच सगळी प्रकरणे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांची रात्रीची झोप उडणार असल्याचेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
नितीन गडकरींची संसदेत मोठी घोषणा; पुढच्या तीन महिन्यांत ‘हे’ टोल नाके होणार कायमचे बंद
“पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती वाढवून भाजपने जनतेला चार राज्यांतील विजयाची भेट दिली”
पेटीएमच्या शेअरमध्ये तुफान घसरण, करोडो रूपये पाण्यात; BSE ने थेट कंपनीकडेच मागीतले स्पष्टीकरण
बुलेटप्रेमींसाठी गुड न्युज! भन्नाट फिचर्ससह येतेय नवीन बुलेट ३५०; फिचर्स वाचून खुष व्हाल






