udhav thackeray : राज्यातल राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापलं आहे तर दुसरीकडे वेगवेगळे प्रकरण चर्चेत आले आहेत. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपांची झोड उठवत आहेत. हे सांगण्याच कारण म्हणजे, नुकतच एक प्रकरण समोर आलं आहे.
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाकडून शिवसैनिकांची खोटी आणि बनावट प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगासमोर दाखल करण्यासाठी तयार केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याचाच धागा पकडत आता उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे.
माध्यमांशी बोलताना सामंत यांनी म्हंटलं आहे की, यापूर्वी राज्यात जसा तेलगी स्टॅम्प घोटाळा झाला तसाच सध्या शंभर कोटींचा स्टॅम्प घोटाळा झाला आहे. जवळपास शंभर कोटींचे स्टॅम्प बनावट नावांनी विकत घेतले गेले आहेत. या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारने सुरू केली आहे.
ठाकरे गटाकडून शिवसैनिकांची खोटी आणि बनावट प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगासमोर दाखल करण्यासाठी तयार केली असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी झाला. तेव्हापासून मुंबई पोलिसांनी या प्रकरणात सूत्र हलवली आहे. गुन्हे शाखेने मुंबईत काही जणांची चौकशी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रतिज्ञापत्रांच्या छाननी करण्यासाठी ठाणे, पालघर, कोल्हापूर, अहमदनगर आणि नाशिक अशा विविध ठिकाणी पथके पाठविण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. वांद्रे न्यायालयाबाहेरून जप्त करण्यात आलेल्या ४ हजार ६८२ बनावट प्रतिज्ञापत्रांच्या तपासाची व्याप्ती आता वाढली आहे.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेच्या चार पथकांनी प्रतिज्ञापत्रातील व्यक्तींची चौकशी करुन जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आता तपास वेगाने करण्यास सुरुवात केली आहे. नेमकं या तपासातून समोर काय येतय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी चूक; प्रसिद्ध लेखकाला जिवंतपणीच वाहीली श्रद्धांजली
sharad pawar : बारामतीच्या जाणता राजाने हात लावला तर राख होते; पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका
Uddhav thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत, मशाल चिन्हही हातातून जाणार? प्रकरण उच्च न्यायालयात