Share

तुमच्या मालकांसह १७ पिढ्या खाली आल्या तरी मुंबई मराठी माणसाचीच राहील; उद्धव ठाकरे गरजले

Uddhav-Thakre-Devendra-Fadanvis.

कालच्या सभेतून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांची चांगलीच शाळा घेतली. ‘तुम्हाला मुंबई फक्त ओरबाडण्यासाठी पाहिजे,’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लक्ष केलं. ‘मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे होतील,’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केला.

अखेर काल राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसीमध्ये जाहीर सभा पार पडली. अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे लागलं होतं. या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या बदल्या भूमिकेवर, विरोधकांवर याचबरोबर हिंदुत्व अशा अनेक मुद्द्यांवर टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, ‘तुम्हाला मुंबई फक्त ओरबाडण्यासाठी पाहिजे. ज्या ज्या वेळा मुंबईवर आपत्ती येते, तेव्हा शिवसेना कार्यकर्ते पहिल्यांदा धावून जातात. कोणतीही आपत्ती येऊ द्या. तो इतरांना मदत करत असतो. रक्तदान करण्यासाठीही अंगात मर्दाचं रक्त असावं लागतं. ते शिवसेनेत आहे.’

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला स्वतंत्र करण्याची भाषा केली. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मुंबईला तोडण्याचा यांचा मनसुबा वेळेत लक्षात घ्या. हे पोटातलं ओठात आलेलं वाक्य आहे,’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना घेरले.

मात्र तुमच्या मालकांसह १७ पिढय़ा खाली आल्या तरी मुंबई मराठी माणसाचीच राहील, ती महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही. मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे होतील, असा गर्भित इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. याचबरोबर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केल्यास दया माया न दाखवता पळता भुई थोडी करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, ‘आमचं हिंदुत्व गधाधारी होतं, पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं. आम्ही गध्याला सोडून दिलं. कारण काही उपयोग नाही त्याचा. जी गाढवं आमच्यासोबत घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत होती, त्या गाढवानं आम्हाला लाथ मारायच्या आधीच आम्ही त्याला लाथ मारली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
..तेव्हा बाळासाहेब ठाकरे कृष्णकुंजवर राज ठाकरेंकडे रहायला आले होते; मनसे नेत्याचा गौप्यस्फोट
नेहा शर्माच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा
VIDEO: नेहा शर्माचा सेक्सी जिम व्हिडिओ पाहून चाहतेही झाले थक्क, बोल्ड अंदाजात करत आहे व्यायाम
करोडपती भिकारी! जंगम मालमत्ता, आलिशान बंगला, अफाट बँक बॅलन्स, तरीही मागतो भीक

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now