‘मोदी आणि शहांच्या निवडणुकीचा अर्ज भरायला आपल्याला आग्रहाने बोलावलं गेलं ते कशासाठी? अत्यंत आग्रहाने यासाठी बोलावलं गेलं कारण त्यांनाही आपल्या चेहऱ्याचा वापर करायचा होता,’ असा गंभीर आरोप राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (udhav thackeray) यांनी केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. (udhav thackeray criticize on BJP)
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘भाजप आपल्यावर टीका करतात की आपण मोदी-शहांच्या चेहऱ्याचा वापर केला तर तसेच भाजपनेही आपल्या चेहऱ्याचा वापर केला आहे, असं आपण म्हणू शकतो. याचे कारण असे की, मोदी आणि शहांच्या निवडणुकीचा अर्ज भरायला आपल्याला आग्रहाने बोलावलं गेलं ते कशासाठी? अत्यंत आग्रहाने यासाठी बोलावलं गेलं कारण त्यांनाही आपल्या चेहऱ्याचा वापर करायचा होता.’
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मधले एकदोन महिने माझे उपचारामध्ये गेले. लवकरात लवकर मी बाहेर पडून महाराष्ट्र पिंजून काढणार. जे माझ्या विरोधात तब्येतीची काळजी घेत आहेत, त्या विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार आहे. हे काळजीवाहू विरोधक कधीतरी आपले विरोधक होते, ज्यांना आपण पोसलं, मागेही मी म्हटलो की २५ वर्षे आपली युतीमध्ये सडली. ते मत ठाम आहे, असं त्यांनी म्हटलं.’
दरम्यान, “आपण खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी असं वागतो. म्हणजे आपण लोकसभा आणि विधानसभा ज्या जिद्दीने लढवतो तेवढ्या जिद्दीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढत नाही. माझ्यासह आपले नेते, मंत्री, जिल्हा प्रमुख त्या निवडणुकांकडे त्या पद्धतीने लक्ष देतात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी हे इतर पक्ष साध्या निवडणुकांकडे देखील लक्ष देतात. अगदी मोठमोठे नेते प्रत्यक्ष निवडणूक लढत नसले तरी प्रत्यक्ष रिंगणात उतरून उमेदवारांना सर्व मदत करतात. तशी मदत आपल्याकडून होत नाही. मी माझ्यापासून सुरुवात करतो. तसं पाहिलं तर मी देखील गुन्हेगार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.
“फेब्रुवारीत भेटलो होतो. त्यावेळी आपण राज्यभर शिवसंपर्क मोहिम राबवायचं ठरवलं होतं. पण कोरोनाची दुसरी लाट आली. आतासुद्धा दिवाळीच्या सुमारास राज्यभर फिरायचं, सगळ्यांचं दर्शन घ्यायचा विचार करत होतो पण थोडं माझं मानेचं दुखणं उपटलं. माझी शस्त्रक्रिया करावी लागली. कोरोनाच्या लाटेमागून लाटा येऊ शकतात. आपण शिवसेनेची लाट का आणू शकत नाही? व्हायरस त्याची लाट एकामागे एक आणत असेल तर आपण शिवसेनेची लाट का आणू शकत नाहीत? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या
…म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली; सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण
पुष्पा पाठोपाठ अल्लू अर्जुनचे हिंदीतील आणखी ६ चित्रपट बाॅलीवूडमध्ये धुमाकूळ घालणार, पहा यादी..
टाटा मोटर्सने वाढवले उत्पादन, या वर्षी सर्व मोठ्या कंपन्यांना मागे टाकणार, पाहा कंपनीचा प्लॅन
‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत संकर्षण कऱ्हाडेच्या भावाची वर्णी; दिसणार ‘या’ भूमिकेत