२९ जूनच्या रात्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर आघाडीत सामील असलेल्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन चूक केलीये, अशी प्रतिक्रिया दिली होती. (Uddhav Thackeray’s resignation is a big mistake?; It was predicted by Prithviraj Chavan)
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याला खरे ठरवणारा युक्तिवाद शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केला. ‘उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला म्हणजे सरकारकडे बहुमत उरलं नव्हतं. त्यानंतरच नवीन सरकार स्थापन झालं आहे,’ असं जेठमलानी म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, ‘उद्धव ठाकरे साहेबांनी विधिमंडळात बहुमत चाचणीला सामोरे जायला हवं होतं. त्यानंतर जे काही झालं असतं, तो निर्णय स्वीकारता आला असता. परंतु त्यांनी आत्ता अशाप्रकारे राजीनामा द्यायला नको होता.’
याच मुद्द्यावर न्यायालयात शिंदे गटाच्या वकिलांकडून आज युक्तिवाद करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बहुमत चाचणीत पराभव झाल्याने शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झालेले नाही.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन सरकार अस्तित्वात आलेले आहे. जर मुख्यमंत्र्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास नकार दिला. तर त्यांच्याकडे अपेक्षित बहुमत नाही असेच गृहीत धरले जाते,असे जेठमलानी यांनी सांगितले.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी तेव्हा तडकाफडकी राजीनामा देणे शिवसेनेसाठी आता मोठी घोडचूक ठरू शकते की काय, असेच चित्र सध्या परिस्थिती पाहता दिसते आहे. परंतु याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावेळी वर्तवलेला अंदाज मात्र सध्या खरा ठरलेला दिसतो.
महत्वाच्या बातम्या-
Uddhav Thackeray: “शिवसेनेने अशी अनेक आव्हानं पायदळी तुडवत भगवा रोवलेला आहे”
Uday Samant: उदय सामंत हल्ल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंवरही पोलीस कारवाई करणार? शिंदे गटातील बड्या नेत्याचे संकेत
Shivsena: शिवसेनेची ताकद प्रचंड वाढणार, राज्यातील मोठा ओबीसी नेता करणार शिवसेनेत प्रवेश