Share

सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या वकीलांचा खणखणीत युक्तिवाद; शिंदे गटाचे टेन्शन वाढले

शिंदे गटाचे भवितव्य ठरवणारा मोठा निर्णय न्यायालयाकडून येणे अजून बाकी आहे. एकीकडे शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई तर दुसरीकडे शिंदे सरकारचे भवितव्य अशी परिस्थिती सध्या आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांच्या जबरदस्त युक्तिवादाने शिंदे गटाच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दिसते. (Uddhav Thackeray’s Lawyers’ Digging Argument in Supreme Court)

न्यायालयात शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. त्यावेळी त्यांनी महत्त्वाच्या प्रश्नांची सरबत्तीच शिंदे गटावर केली. आपल्या युक्तिवादात त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहे.

शिंदे गटांनी फूट मान्य केली आहे. शिंदे गटासमोर पक्षांतर बंदी हा पर्याय आहे. सरकार हवं असेल तर नवीन पक्ष किंवा विलिनीकरण शिंदे गटाला मान्य करावे लागेल. शिवसेना पक्षावर शिंदे गट दावा करू शकत नाही. दोन तृतीयांश असा गट असू शकतो, पक्ष नाही. त्यासाठी मुळ पक्ष असल्याचे निवडणूक आयोगासमोर सिद्ध करावे लागेल.

कपिल सिब्बल यांनी दहाव्या सूचीनुसार मुळ पक्ष म्हणजे काय? याच सविस्तर वाचन केलं. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने ते पक्षाचे सदस्य ठरत नाहीत. पक्षाचा आदेश डावलल्यामुळे शिंदे गटातील सदस्य अपात्र ठरतात.

व्हीप हा राजकीय पक्ष आणि विधिमंडळ यातील दुवा आहे. गट वेगळा असला तरी तुम्ही शिवसेनेचे सदस्य आहात. त्यामुळे पक्षाचे आदेश बंधनकारक आहेत. शिंदे गटाला बहुमत असलं तरी व्हीप मात्र मुळ पक्षाचाच लागू होतो.

उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे पक्षप्रमुख असल्याचे शिंदे गटाने मान्य केले आहे. शिंदे गटाचा बहुमताचा दावा दहाव्या सूचीनुसार अमान्य आहे. विधिमंडळात शिंदे गटाला बहुमत याचा अर्थ पक्ष त्यांचा असं होत नाही. त्यामुळे शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई करावी, असा जबरदस्त युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून न्यायालयात करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
गणेशोत्सवात शेवटच्या ५ दिवसांत रात्री १२ पर्यंत साऊंड सिस्टीम वाजवता येणार; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा
एकनाथ शिंदेचा पुण्यात येताच अजितदादांना धक्का; एका झटक्यात बदलला ‘तो’ निर्णय
Gum hai kisi ke pyar hai: ‘गुम है किसी के प्यार है’ मधील अभिनेत्री झाली अजूनच हॉट, असे कपडे घालून आली की.., पहा फोटो

ताज्या बातम्या इतर राजकारण

Join WhatsApp

Join Now